Shani Gochar 2023 : 15 मार्चपासून पुढचे सात महिने या राशींची चांदी, शनिदेवांची अशी असेल कृपा

| Updated on: Mar 15, 2023 | 1:54 PM

शनिदेवांनी 15 मार्च 2023 रोजी राहुच्या शतभिषा नक्षत्रात गोचर केलं आहे. या गोचरामुळे काही राशींना लाभ होणार आहे. चला जाणून कोणत्या राशींना फायदा होणार ते

Shani Gochar 2023 : 15 मार्चपासून पुढचे सात महिने या राशींची चांदी, शनिदेवांची अशी असेल कृपा
शनिदेव राहुच्या शतभिषा नक्षत्रात विराजमान,या राशींसाठी 'अच्छे दिन'
Follow us on

मुंबई : ग्रहांमध्ये न्यायदेवतेचं स्थान असलेले शनिदेव एका राशीत अडीच वर्षे राहतात. त्या दरम्यान राशी परिवर्तनसोबत नक्षत्र गोचर देखील करतात. 15 मार्च 2023 रोजी सकाळी 11 वाजून 40 मिनिटांना शनिदेवांनी शतभिषा नक्षत्राच्या पहिल्या चरणात प्रवेश केला आहे. शनिदेव या नक्षत्रात 17 ऑक्टोबर 2023 पर्यंत दुपारी 1 वाजून 37 मिनिटांपर्यंर राहतील. हे नक्षत्र राहुचं असल्याने काही राशींवर शुभ, तर काही राशींवर अशुभ परिणाम दिसून येईल. इतकंच काय तर काही सात महिने एकदम सुगीचे जातील असं ग्रहमान आहे. चला जाणून घेऊयात 12 राशींवरील प्रभाव…

मेष : या राशीवर शनिदेवांची कृपा राहील. सध्याचा व्यवसाय विस्तार करण्यासाठी अनुकूल काळ आहे. खासगी क्षेत्रात प्रगतीची शक्यता आहे. कारण शनिदेव आपल्या मूळत्रिकोण राशीत असणार आहत. पण पाचव्या स्थानावर नजर असल्याने जरा सावध राहावं लागेल. जर तुम्ही तुमच्या जोडीदाराची फसवणूक करत असाल तर मात्र पकडले जाल.

वृषभ : या राशीच्या दहाव्या स्थानात शनिदेव आहेत. त्यामुळे नोकरी किंवा व्यवसायाच्या शोधात असलेल्यांना अपेक्षित यश मिळेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगलं फळ मिळेल. तसेच वैयक्तिक प्रगती या काळात दिसून येईल.

मिथुन : या राशीच्या नवव्या स्थानात शनिदेव असून विदेशवारीसाठी अनुकूल काळ आहे. कोर्स करण्यासाठी किंवा विदेशात शिक्षण घेण्याच्या प्रक्रियेला चालना मिळेल. पीआरसाठी प्रयत्नशील असलेल्या जातकांना या काळात फायदा होईल.

तूळ : या राशीच्या जातकांना फायदा होईल. नव्या जबाबदारीससह कंपनीत पदोन्नती होऊ शकते. व्यवसायासाठी नवी संधी चालून येतील. तसेच अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. मात्र शॉर्टकटने पैसे कमवण्याच्या नादात अडकू नका. विद्यार्थ्यांना या काळात अपेक्षित यश मिळेल.

वृश्चिक : कामात लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे. कारण एका चुकीमुळे मोठं नुकसान होऊ शकतं. जर तुम्हाला नोकरीत बदल करायचा असेल तर हा काळ उत्तम आहे. पण व्यवसाय करणाऱ्यांनी या काळात काळजी घेणं गरजेचं आहे. नवी गुंतवणूक करण्यापासून सावध राहणं गरजेचं आहे. विदेशात शिक्षण घेणाऱ्यांसाठी शनि गोचर फलदायी ठरेल.

मकर : शनिदेव या राशीच्या दुसऱ्या स्थानात गोचर करणार आहेत. त्यामुळे कमी मेहनतीत अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. या काळात उच्च पद मिळू शकते. मात्र विद्यार्थ्यांनी या काळात जास्त मेहनत घेणं गरजेचं आहे. विदेश यात्रा करण्याचा योग जुळून येईल. दुसरीकडे आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)