AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold-Silver Rate Today 5 February 2026 : विचारात वेळ नका घालवू , सोन्या-चांदीच्या किंमतीत पुन्हा भूकंप, पटापट जाणून घ्या दर आणि दुकानात घ्या धाव

Gold-Silver Rate Today 5 February 2026 Latest News Updates in Marathi: आज 5 फेब्रुवारी रोजी सकाळी बाजार उघडताच भूकंप होऊन सोन्या-चांदीच्या किंमतीत पुन्हा मोठी घसरण झाली आहे. MCX वरचे दर पाहून ग्राहक नक्कीच आनंदाने घेतील गिरकी. काय आहेत आजचे दर ?

Gold-Silver Rate Today 5 February 2026 : विचारात वेळ नका घालवू , सोन्या-चांदीच्या किंमतीत पुन्हा भूकंप, पटापट जाणून घ्या दर आणि दुकानात घ्या धाव
सोनं-चांदीचे दर आज किती घसरले ? Image Credit source: PTI
| Updated on: Feb 05, 2026 | 11:43 AM
Share

Gold Silver Rate Today : गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने वाढणारं सोन-चांदी आता आपल्या बजेटबाहेर गेलंय, आता फक्त दुकानातलांबून सोन्याचे दागिने बघायचे. खरेदीचा विचारही नको.. अशीच भावना सर्वसामान्य ग्राहकांची होती. मात्र मार्केट कधीच सेम नसतं, चढ-उतार होतच राहतात. याचा प्रत्यय गेल्या काही दिवसांपासून येत असून सोनं-चांदीच्या दरात चांगलीच घसरण पहायला मिळत आहे. घसरणीचा हा ट्रेंड आजही कायम असून आज ( 5 फेब्रुवारी 2026) सकाळी मार्केट उघडताच मोठा भूकंप झालाय. MCX वर ( मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिय) बाजार उघडताच सोनं-चांदीचे दर झर्रकन खाली आलेत. देशांतर्गत बाजारपेठ आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली.

स्पॉट गोल्ड जवळजवळ 2.5 टक्क्यांनी घसरले आणि प्रति औंस 5 हजार डॉलर्सपेक्षा जास्त टिकू शकले नाही, ते4.850.16 डॉलर्स प्रति औंसवर घसरले. दरम्यान, चांदीमध्ये लक्षणीय घट झाली आणि दर 14 टक्क्यांनी सुळकन खाली घसरले. आता चांदी 88.965 डॉलर प्रति औन्सवरून 75.386 डॉलरपर्यंत घसरली आहे.

MCX वर काय झाले हाल ?

आंतरराष्ट्रीय बाजाराव्यतिरिक्त, एमसीएक्सवरही (MCX) सोनं आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली. गोल्ड एप्रिल फ्यूचर्सचा भाव जवळपास 3 टक्क्यांनी घसरून प्रति ग्रॅमसाठी 1,48,455 इतका झाला. तर सिल्व्हर मार्च कॉन्ट्रॅक्ट 9 टक्क्यांनी घसरून प्रति किलो 2,44,654 रुपये झाला. याचा अर्थ सोने एकाच दिवसात 4 हजार रुपयांपेक्षा जास्त स्वस्त झाले, तर चांदी 24000 रुपयांनी घसरली आहे.

किरकोळ किमतीतही घसरण

किरकोळ बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीही घसरल्या. बुलियन वेबसाइटनुसार, सोने 2110 रुपयांनी घसरून 1, 51,460 रुपये प्रति १० ग्रॅम झाले. तर चांदी 25, 990 रुपयांनी घसरून 2,45,490 रुपये प्रति किलो झाली.

मोठी घसरण का ?

बाजारातील तज्ज्ञांच्या मते, भू-राजकीय तणाव कमी झाल्यामुळे आणि अमेरिका आणि इराणमधील चर्चेच्या बातम्यांमुळे सुरक्षित गुंतवणुकीची मागणी कमी झाली आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, ओमानमध्ये दोन्ही देशांमधील चर्चा होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांचा कल धोकादायक मालमत्तेकडे वाढला आहे. दरम्यान, डॉलर निर्देशांक मजबूत झाल्याने मौल्यवान धातूंवर परिणाम झाला. डॉलर 0.20 टक्क्यांनी वाढून 97.81 वर पोहोचला, ज्यामुळे परदेशी गुंतवणूकदारांसाठी सोने आणि चांदी महाग झाली.

Follow Us
एकच खळबळ! भाजपमध्ये भयंकर घडतंय... नरेंद्र मोदी आहे तोपर्यंतच शांतता..
एकच खळबळ! भाजपमध्ये भयंकर घडतंय... नरेंद्र मोदी आहे तोपर्यंतच शांतता... राज ठाकरेंचा मोठा दावा
खासदार फोडणं, आमदार फोडणं... राज्याचा विचका झालाय!; राज ठाकरे भडकले
खासदार फोडणं, आमदार फोडणं... राज्याचा विचका झालाय!; राज ठाकरे भडकले
पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणी कोर्टात काय घडतंय? न्यायालयाने नमूद
Pawanraje Nimbalakr Case | पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणी कोर्टात काय घडतंय? न्यायालयाने नमूद केल्या महत्त्वाच्या गोष्टी
परभणीत ATS चा धडाका! 10 ठिकाणी छापेमारी, अनेक जण ताब्यात!
Parbhani News | परभणीत ATS चा धडाका! 10 ठिकाणी छापेमारी, अनेक जण ताब्यात!
निंबाळकरांसाठी 84 सभा अन् मीदेखील तीन दिवस तिथेच... संजय राऊतांनी
निंबाळकरांसाठी 84 सभा अन् मीदेखील तीन दिवस तिथेच... संजय राऊतांनी सांगितली 2024 मधील ती गोष्ट
कसलं ऑपरेशन टायगर? घंटा! ते खासदार घंटा...; राऊतांनी उडवली खिल्ली
Sanjay Raut | कसलं ऑपरेशन टायगर? घंटा! ते खासदार घंटा वाजवत बसतील; राऊतांनी उडवली खिल्ली
20 वर्षांचा न्यायाचा संघर्ष! पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा आज निकाल
Omraje Nimbalkar | 20 वर्षांचा न्यायाचा संघर्ष! पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा आज मोठा निकाल; ओमराजे मुंबईच्या दिशेने रवाना
अखेर फोटो समोर आला! ऑपरेशन टायगरमधील बंडखोर खासदार कुठे आहेत?
मोठी बातमी! अखेर फोटो समोर आला! ऑपरेशन टायगरमधील बंडखोर खासदार कुठे आहेत?, फोटोमधून झाला खुलासा
कुत्रे भुंकतात… वाघ शिकार करतो! शिंदेंचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल!
कुत्रे भुंकतात… वाघ शिकार करतो! शिंदेंचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल!
हिम्मत असेल तर समोर या! शिंदेंचं ठाकरेंना थेट खुलं आव्हान
Eknath Shinde | हिम्मत असेल तर समोर या! शिंदेंचं ठाकरेंना थेट खुलं आव्हान, ऑपरेशन तुडवावर जोरदार पलटवार