AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खासदार आमदारांप्रमाणे मुलं पळवली जातात, मुलींना वेश्याव्यवसाय ढकललं जातंय, तर ‘लाडक्या बहिणीं’ना… राज ठाकरेंचा खबरदारीचा इशारा

मुंबईत झालेल्या मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांनी देशातील आत्महत्येची वाढती संख्या, मुलांची पळवणूक, मुलींना वेश्याव्यवसाय ढकललं जातंय यावर मोठा खुलासा केला. शिवाय 'लाडक्या बहिणीं'ना... राज ठाकरे यांनी खबरदारीचा इशारा दिला.

खासदार आमदारांप्रमाणे मुलं पळवली जातात, मुलींना वेश्याव्यवसाय ढकललं जातंय, तर 'लाडक्या बहिणीं'ना... राज ठाकरेंचा खबरदारीचा इशारा
Raj Thackeray
| Updated on: Jun 20, 2026 | 12:42 PM
Share

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकताच मुंबईत मेळावा घेतला. मेळाव्यामध्ये देशातील आत्महत्येचा आकडा वाढला आहे, असं सांगत राज ठाकरे यांनी Indian Express चा रिपोर्ट सादर केला… काश्मीर येथे 16 लोकांनी आत्महत्या केल्या आहेत. सगळीकडचे आकडे समोर आले आहेत, प्रत्येक राज्याचे आकडे दिले आहेत. कुठे 11 तर कुठे 42, 106, 615, मध्य प्रदेशमध्ये 15 हजार, गुजरातमध्ये 8 हजार, सर्वात मोठा आकडा महाराष्ट्रातील आहे, 22 हजार 174… शेतकरी आत्महत्या करत आहेत. विद्यार्थी आत्महत्या करत आहेत. नीटचे पेपर फुटत आहे, ज्याला आपण पूर्वीच विरोध केलेला. आज लहान मुलं पळवण्याचं प्रमाण वाढलं आहे.

खासदार आमदार जसे पळवले जात आहेत, तसे लहाण मुलं पळवली जाता आहे. मुली पळवल्या जात आहेत. त्याचे व्यापार होत आहेत, त्यांना परदेशी पाठवलं जात आहे. काही मुलींना तर वेश्याव्यवसायासाठी पाठवलं जात आहे. एवढे सगळे प्रश्न आज देशासमोर उभे असताना आमच्याकडे काय चालू आहे, आमची सत्ता टिकावी म्हणून आम्ही करोडो रुपये टाकायला तयार आहोत. आम्हाला खासदार फोडायचे आहेत, आमदार फोडायचे आहेत, नगरसेवक फोडायचे आहेत. तुमच्या मताला किंमत काय? शुन्य… असं देखील राज ठाकरे म्हाणाले…

पुढे राज ठाकरे म्हणाले, ‘तुम्ही कोण आहात कोणी नाही. रांगेत उभे राहा. मेंढरासारखे मतदान करा आणि मोकळे व्हा… आज भाजपकडून सुरु आहे, उद्या दुसऱ्या पक्षाकडून सुरु होईल. या पळवा-पळवीच्या राजकारणात आपण मुलभूत गोष्टी विसरत आहोत…’, असं देखील राज ठाकरे म्हणाले…

लाडक्या बहिणींवरून राज ठाकरे यांची सरकारवर टीका

लाडकी बहीण योजना आणली मी तेव्हाच सांगत होतो, महिलांच्या सक्षमिकरणाकडे जास्त लक्ष द्या, त्यावर पैसे खर्च करा. महिलांना पैसे देण्याची गरज नाहीये. दीड हजार रुपये देतात, महिन्याला ते दीड हजार जातात कुठे बघून घ्या… फुकट कोणतीही गोष्ट दिल्यानंतर राज्य चालू शकत नाही. देश चालू शकत नाही. 1 रुपया द्यायचा आणि 100 रुपये ओरबाडून घ्यायचे… हे गणित आपण कधी मांडणार आहोत की नाही? कोण सत्तेत आहे याच्याशी मला मतलब नाही, आपण काय देशाचं वाटोळं करत आहोत. असं देखील वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं आहे.

Follow Us
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त