AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माफीच्या साक्षीदाराविषयी मोठी टिप्पणी, पवनराजे निंबाळकर हत्याप्रकरणात कोर्टाचे मोठे निरीक्षण, निकालाचे वाचन

Pawanraje Nimbalakar Murder Case: पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने माफीच्या साक्षीदारांविषयी मोठी टिप्पणी केली आहे. कोर्टाने महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले आहे. माफीच्या साक्षीदाराची भूमिका याप्रकरणात महत्त्वाची होती. त्याविषयीच कोर्टाने आसूड ओढला आहे.

माफीच्या साक्षीदाराविषयी मोठी टिप्पणी, पवनराजे निंबाळकर हत्याप्रकरणात कोर्टाचे मोठे निरीक्षण, निकालाचे वाचन
‘कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है’
| Edited By: | Updated on: Jun 20, 2026 | 12:36 PM
Share

Pawanraje Nimbalakar Murder Case: हायप्रोफाईल पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयात निकालाचे वाचन सुरू आहे. यावेळी याप्रकरणाती महत्त्वाचे दुवे, पुरावे, मुद्यांवर कोर्टाने महत्त्वाची टिप्पणी केली आहे. त्यात माफीच्या साक्षीदाराची वारंवार बदलेली साक्ष संशयास्पद असल्याचे निरीक्षण कोर्टाने नोंदवले आहे. चार्जशीट दाखल होण्याच्या काही दिवस आधी पुन्हा माफीच्या साक्षीदाराचा जबाब नोंदवण्यात आला. त्याला प्रश्न विचारले उत्तरे घेतली. २४ तासांच्या ऐवजी १०० तासांचा वेळ दिला आणि पुन्हा बोलवून जबाब नोंदवला.

आरोपीने काय सांगितलं, त्याचा हेतू काय आहे तो कोणत्या मनस्थितीत आहे आणि स्वेच्छेने देतोय का हे पाहायला हव. पण जबाब नोंदवून न्यायाधीशनी त्यावर स्वाक्षरीच केली नाही. माफीचा साक्षीदाराच्या जबाबात बऱ्याच तफावती आहेत. दोन कबुली जबाबात बरेच बदल आहेत. माफीच्या साक्षीदाराची अटक, त्याची घेतलेली अवैध कोठडी आणि घेतलेले दोन वेगवेगळे जबाब हे बारकाईने पाहणे कोर्टासाठी महत्वाचे आहे. माफीच्या साक्षीदाराने न्यायालयात काही अर्ज दिलेले आहेत. माफीचा साक्षीदार सांगतोय की त्याला खोट्या गुन्हात अडकवण्याचा प्रयत्न झाला. त्याला आजारपणाची औषध घेऊ दिली नाहीत, असे निरीक्षण कोर्टाने नोंदवले आहे.

माफीचा साक्षीदार कुठेही पलटतो

निकाल वाचनादरम्यान न्यायालयाने एक महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले. माफीचा साक्षीदार कुठेही पलटतो आहे असे निदर्शनास आले आहे, असे मुंबई सत्र न्यायालयाने म्हटले आहे. उर्वरीत सर्व आरोपी जामिनावर सुटले होते. मी आतमध्ये आहे आणि बाकी सगळे एंजॉय करतायत असेही त्याने अर्ज केलेले आहेत. ५ मार्च २०१९ चा तसा अर्ज त्याने केलेला आहे. या अर्जातील मजकुरावरून इतर आरोपींच्या विरोधात त्याच्या मनात ईर्षा निर्माण झाल्याचे दिसते आणि संशयाचे ढग आणखी गडद होतात. आधी नाकारलेला कबूलीजबाब तपास यंत्रणाने नंतर विचारात घेतला, असे निरीक्षण कोर्टाने नोंदवले.

‘कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है’

साक्षीदाराला पैश्यांची गरज होती त्यामुळे त्याने आरोपी क्रमांक ३ कडे ५० हजारांची मागणी केली होती. त्यावर साक्षीदाराला आरोपी बोलला होता की ‘कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है’ साक्षीदारांची अनेक घर, व्यवसाय आणि जंगम मालमत्ता होती आणि सगळे व्यवसाय भरभराटीला होते असे जबाब देतो त्यामुळे एवढ सगळं असताना साक्षीदार हा ५० हजार रुपये मागतो हे पटत नाही, असे निरीक्षण कोर्टाने नोंदवले आहे.

साक्षीदाराची आर्थिक गरज आणि विवंचना सिद्ध होत नाही. सगळ्यात महत्वाचं या प्रकरणात तपासादरम्यान कोणाचाही फोन जप्त करण्यात आला न्हवता, कोणाचेही सीडीआर मागवले नव्हते. आरोपींना अटक करताना त्यांच्या खिशात काय होते याचीही साधी नोंद नाही, अशी पोलीस अधिकारी आणि एकूणच प्रक्रियेवर कोर्टाने टिपण्णी केली आहे.

मोबाईल जप्त का नाही?

मोबाईल जप्त होणे अपेक्षित होते पण तपास अधिकाऱ्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही. न्यायालयाला मोबाईल रेकॉर्डचा पुरावा मिळालेला नाही. साक्षीदाराने वेगवेगळ्या कथा सांगितल्या आहेत त्याला इतर कुठलाही पुरावा नाही. इंद्रप्रस्थ गेस्ट हाऊसमध्ये आरोपी वारंवार राहिला होता असे सांगण्यात आले मात्र त्याचाही थेट कुठलाही पुरावा किंवा कागद रेकॉर्डवर दिलेला नाही असे निकाल वाचनात कोर्टाने नमूद केले.

माफीच्या साक्षीदाराविषयी महत्त्वाचे निरीक्षण

घराजवळ संशयास्पद हालचाली होत्या हेही कुटुंबियांच्या जबाबात आधी नव्हते. पण नंतर ते टाकण्यात आले. माफीच्या साक्षीदाराकडे सोनं आहे. मीरा भाईंदर आणि मुंबईत त्याची घरे आहे आणि दुकाने आहेत. वारंवार बदललेली साक्ष विसंगत आणि संशायस्पद आहे. माफीच्या साक्षीदाराने ५० हजारासाठी कबुली दिली हे पटत नाही. आरोपींच्या मोबाईलचे सीडीआरही काढले नाही. मोबाईल जप्त केले नाहीत. अटक करताना आरोपीच्या खिशात काय होते याचाही उल्लेख नाही. आतापर्यंतचे निकालाचे वाचन पाहता सरकारी पक्ष आणि तपास यंत्रणांतील असंख्य त्रुटी दर्शवणारा आहे. कोर्टाकडून सविस्तर निकालाचे वाचन केले जात आहे.

Follow Us
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे...
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे दृश्य पाहाच!
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं....
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं बरळण्यापेक्षा...
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया...
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर, एका वाक्यातच...
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी अखेर Metaने मागितली माफी, पहा व्हिडीओ
वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळ
Walmik Karad | वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळबळ
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत?
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत? सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut On SC Hearing | शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात...
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात नेमकं काय घडलं?
कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून...
Kunbi Certficate | कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून मोठी अपडेट समोर!