Omraje Nimbalkar | 20 वर्षांचा न्यायाचा संघर्ष! पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा आज मोठा निकाल; ओमराजे मुंबईच्या दिशेने रवाना
निंबाळकर कुटुंबाशी संबंधित पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांडाचा 20 वर्षांनंतर आज न्यायालयात निकाल लागण्याची शक्यता आहे. या प्रकरणात डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

निकालाच्या पार्श्वभूमीवर बोलताना ओमराजे निंबाळकर यांनी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली. “माझ्या कुटुंबाने गेली 20 वर्षे आणि 17 दिवस अविरत संघर्ष केला आहे. आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत. आता न्यायदेवतेकडून न्याय मिळावा, अशी अपेक्षा आहे,” असे ते म्हणाले.
राजकीय भूमिकेबाबत विचारले असता त्यांनी सध्या कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. “आज माझ्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा दिवस आहे,” असे सांगत त्यांनी यावर अधिक बोलणे टाळले.
सध्या ओमराजे निंबाळकर मुंबईकडे रवाना झाले असून, या संपूर्ण घडामोडींवर राज्याचे लक्ष लागले आहे.
Published on: Jun 20, 2026 10:34 AM
20 वर्षांचा न्यायाचा संघर्ष! पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा आज निकाल
अखेर फोटो समोर आला! ऑपरेशन टायगरमधील बंडखोर खासदार कुठे आहेत?
कुत्रे भुंकतात… वाघ शिकार करतो! शिंदेंचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल!
हिम्मत असेल तर समोर या! शिंदेंचं ठाकरेंना थेट खुलं आव्हान