AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shrawan Vinayak Chaturthi 2023 : आज श्रावणातील पहिली विनायक चतुर्थी, या राशीच्या लोकांवर राहणार गणरायाची कृपा

सध्या अधिकमहीना सुरू आहे. तसेच या महिन्याला अधिक श्रावण देखील म्हणतात. अशा परिस्थितीत श्रावण महिन्यात येणारी ही विनायक चतुर्थी (Shrawan Vinayak Chaturthi 2023) अत्यंत महत्त्वाची ठरते. काही राशीच्या लोकांना आज बाप्पाचा विशेष आशिर्वाद प्राप्त होणार आहे.

Shrawan Vinayak Chaturthi 2023 : आज श्रावणातील पहिली विनायक चतुर्थी, या राशीच्या लोकांवर राहणार गणरायाची कृपा
गणपतीImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jul 21, 2023 | 10:30 AM
Share

मुंबई : हिंदू दिनदर्शीकेनुसार, चतुर्थीचा उपवास दर महिन्यात दोनदा केला जातो. ज्यामध्ये पहिल्या चतुर्थीला विनायक चतुर्थी (Vinayak Chaturthi Shrawan 2023) आणि दुसऱ्याला संकष्ट चतुर्थी म्हणतात. सध्या अधिकमहीना सुरू आहे. तसेच या महिन्याला अधिक श्रावण देखील म्हणतात. अशा परिस्थितीत श्रावण महिन्यात येणारी ही विनायक चतुर्थी अत्यंत महत्त्वाची ठरते. या दिवशी काही राशींवर भगवान विष्णू, भगवान शिव शंकर आणि भगवान गणेश यांचा आशीर्वाद वर्षाव होईल. काही राशीच्या जातकांना बाप्पाच्या कृपेने शुभ वार्ता मिळेल.

या राशीच्या लोकांवर होणार गणरायाची कृपा

मेष

अनेक दिवसांपासून अडकलेले महत्त्वाचे काम आज पूर्ण करू शकाल. श्रीगणेशाच्या कृपेने तुमची एखादी जुनी योजना मार्गी लागेल. आजचा दिवस तुमच्या मनाला आनंद देईल. एखाद्या प्रिय व्यक्तीची गाठ-भेट होण्याची शक्यता आहे. तुमच्या स्वभावामुळे लोकं तुमच्याकडे आकर्षित होतील.

मिथुन

आज तुम्ही भविष्यासाठी काही योजना आखाल. या योजनांचा भविष्यात फायदा होईल. आज तुम्हाला अधिक निरोगी वाटेल. नवीन उर्जेच्या संचारामुळे प्रलंबित कामे लवकर पूर्ण कराल. दिवसाच्या शेवटी समाधानी असाल.

सिंह

परोपकारासाठी आजचा दिवस चांगला राहील. तुमची प्रगती काही लोकांना त्रास देईल. तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. आज बोलताना सावध राहा, तुम्ही एखाद्याला दुखवू शकता. जुणी येणी वसूल होईल.

तूळ

आज स्वतःसाठी काही खरेदी करण्याचा दिवस आहे. गणरायाच्या कृपेने सर्व अडणींवर यशस्वीपणे मात कराल. जर काही गुंतवणूक केली असेल तर आज तुम्हाला त्याचा फायदा मिळेल. प्रेमावर विश्वास ठेवा.

धनु

आज गणरायाच्या कृपेने काही आनंदवार्ता एकायला मिळू शकते. जोडीदाराशी बोलताना काळजीपूर्वक बोलणे लक्षात ठेवा, अन्यथा त्रास होऊ शकतो. तुमच्या मनात काही चिंता असेल तर ध्यान केल्याने आराम मिळेल. वडिलोपार्जीत मालमत्तेचे प्रकरण मार्गी लागेल.

कुंभ

रिकाम्या लोकांसोबत वेळ वाया घालवू नका. आज उत्साहाने नवीन कामाला सुरूवात करा. भांडण करण्याऐवजी वाद मिटवणे योग्य ठरेल. जर तुम्ही एखाद्यावर प्रेम करत असाल तर ते व्यक्त करण्याचा आजचा दिवस उत्तम आहे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...