कन्या राशीत सूर्य-शुक्र ग्रह युती, कोणासाठी असेल शुभ आणि कोणावर असेल भारी

| Updated on: Sep 13, 2022 | 5:11 PM

 10 सप्टेंबर 2022 रोजी बुध, बुद्धिमत्ता, व्यवसाय आणि वाणीचा ग्रह कन्या राशीत प्रतिगामी झाला आहे. कन्या ही बुध ग्रहाची राशी आहे. अशा स्थितीत बुध ग्रहाचे स्वतःच्या राशीतले स्थान अनेक अर्थाने विशेष सिद्ध होईल.

कन्या राशीत सूर्य-शुक्र ग्रह युती, कोणासाठी असेल शुभ आणि कोणावर असेल भारी
जोतिषशास्त्र
Image Credit source: Social Media
Follow us on

Astrology: सप्टेंबर महिन्यात राशी परिवर्तनासाठी (planet Transit) एक विशेष आणि महत्त्वाचा योग तयार होणार आहे. सप्टेंबरमध्ये अनेक ग्रहांचा संयोग कन्या राशीत होत आहे.  याच महिन्यात, बुध ग्रह कन्या राशीमध्ये (Horoscope) प्रतिगामी  होत आहे. याशिवाय काही दिवसांनी सूर्य आणि शुक्राचा संयोग देखील कन्या राशीमध्ये तयार होणार आहे. कन्या राशीत बुध, सूर्य आणि शुक्र यांच्या संयोगामुळे संमिश्र फळ काही राशींना मिळणार आहे.  काही लोकांना फायदा तर काहींना नुकसान होण्याची चिन्हं आहेत.

सप्टेंबरमध्ये कन्या राशीत हालचाल

10 सप्टेंबर 2022 रोजी बुध, बुद्धिमत्ता, व्यवसाय आणि वाणीचा ग्रह कन्या राशीत प्रतिगामी झाला आहे. कन्या ही बुध ग्रहाची राशी आहे. अशा स्थितीत बुध ग्रहाचे स्वतःच्या राशीतले स्थान अनेक अर्थाने विशेष सिद्ध होईल. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य दर महिन्याला आपली राशी बदलतो. अशा स्थितीत 17 सप्टेंबर रोजी सूर्यदेव कन्या राशीत प्रवेश करणार असून, त्यांचा स्वतःच्या राशीतला सिंहाचा प्रवास थांबणार आहे. ज्योतिषशास्त्रात सूर्य हा आत्मविश्वास, नेतृत्व क्षमता, सरकारी नोकरी आणि सन्मानाचा कारक मानला गेला आहे. यानंतर 24 सप्टेंबर रोजी लोकांच्या जीवनात सुख, सौंदर्य, समृद्धी आणि ऐश्वर्य घेऊन येणारा शुक्र ग्रह कन्या राशीत प्रवेश करेल.

कन्या राशीत सूर्य-शुक्र संयोग

ज्योतिष शास्त्रामध्ये सूर्य आणि शुक्र हे दोन्ही शुभ ग्रह मानले जातात, परंतु हे दोन्ही ग्रह एखाद्या राशीमध्ये एकत्र आले तर ते अशुभ परिणाम देतात. ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हाही एखादा ग्रह सूर्याजवळ येतो तेव्हा त्या ग्रहाचा प्रभाव कमी होतो, त्यामुळे काही काळासाठी तो प्रभावहीन होतो. या कारणास्तव शुक्राचा सूर्याशी संयोग झाल्यामुळे शुक्राचे शुभ परिणाम कमी होतील. शुक्र-सूर्य यांच्या संयोगाला युति योग म्हणतात.

हे सुद्धा वाचा

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)