
स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन चैत्र शुद्ध द्वितियेला मानला जातो. म्हणजे आज मार्च महिन्याच्या अखेरच्या दिवशी 31 मार्चला श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सगळीकडे साजरा केला जात आहे. स्वामींची विशेष पूजा, विशेष स्वामी सेवा, नामस्मरण, मंत्रांचे जप, स्तोत्रांचे पठण अशा अनेक सेवा आज स्वामींचे भक्त करत असतात. स्वामी समर्थांची कृपा आपल्यावर असावी यासाठी त्यांचे भक्त मनोभावे त्यांची सेवा करतात.
कालच हिंदू नव वर्षाला सुरुवात झाली आहे. नववर्ष सुरू होतानाच अतिशय शुभ, दुर्मिळ, दुर्लभ योग जुळून आले आहेत. अनेक राजयोग जुळून आलेले आहेत. यामुळे ज्योतिषशास्त्रानुसार आज काही राशींवर स्वामी महाराजांची कृपा होणार आहे. मीन राशीत पंचग्रही योग जुळून आला आहे. आताच्या घडीला मीन राशीत सूर्य, शनि, बुध, शुक्र, राहु आणि नेपच्युन हे ग्रह विराजमान आहेत. तर चंद्र मेष राशीत असणार आहे. सूर्य रेवती नक्षत्रात प्रवेश करणार आहे. तसेच सर्वार्थ सिद्धी योग, अश्विनी नक्षत्राचा शुभ योग जुळून आलेला आहे. एकंदरीत ग्रहमान पाहता श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन 5 राशींसाठी अत्यंत फलदायी ठरणार आहे. स्वामींच्या केलेल्या भक्तिचं फळ आता या पाच राशीच्या लोकांना मिळणार आहे, असं म्हणायला हरकत नाही.
स्वामींचा वरदहस्त असलेल्या ‘त्या’ पाच राशी कोणत्या
मिथुन रास
घरात उत्साही वातावरण राहील. अपेक्षेपेक्षा जास्त प्रमाणात यश मिळेल. व्यापारात चढ-उतार जाणवतील. जवळच्या मित्रांच्या गाठी पडतील. पैसे गुंतवताना काळजी घ्यावी. कामाच्या ठिकाणी आपली पत सांभाळावी. अडलेली कामे मार्गी लागतील. नोकरी आणि कामाच्या बाबतीत फायदा आणि प्रगतीची संधी मिळू शकेल. सहकाऱ्यांकडून पाठिंबा आणि सहकार्य मिळेल. मनातली इच्छा पूर्ण होऊ शकेल.
कन्या रास
या राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होईल. बुद्धिमत्तेचा आणि कार्यक्षमतेचा फायदा होऊ शकेल. करिअरबद्दल मोठा निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते. कामाच्या ठिकाणी प्रभाव आणि आदर वाढेल. अनपेक्षितपणे पैसे कमविण्याची संधी मिळू शकते. भावंडांकडून अपेक्षित सहकार्य मिळू शकेल. भेटवस्तू मिळू शकतात. काही नवीन मित्र बनू शकतात. भौतिक सुखसोयी मिळाल्याने आनंदी व्हाल.
धनु रास
घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. चांगले अनुभव येतील. आर्थिक लाभ होतील. कार्यक्षेत्रात तुमचे नाव होईल. वडिलांकडून आणि मोठ्या भावाकडूनही सहकार्य आणि लाभ मिळू शकेल. मुले प्रगती करतील. गुंतवणुकीतून भविष्यातील फायदे मिळण्यावर भर राहू शकेल. प्रॉपर्टी व्यवसायात गुंतलेल्या लोकांना चांगला सौदा मिळाल्याने आनंद होऊ शकेल.
मकर रास
शुभ आणि फलदायी काळ असेल. मनात सकारात्मक विचार राहतील. समाजात मान वाढेल. व्यावसायिक उलाढाल वाढेल. चिकाटी सोडू नका. कामे मार्गी लागतील. एखादी इच्छा पूर्ण होऊ शकते. शुभकार्यात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. आर्थिक प्रयत्न यशस्वी होऊ शकतील. नोकरीत प्रभाव आणि महत्त्व वाढेल. मित्र आणि नातेवाईकांना भेटण्याची संधी मिळेल. एखादी चांगली बातमी मिळू शकेल.
मीन रास
आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. मनावरील दडपण बाजूला सारावे. बोलण्याला धार येईल. स्वतःच्या मतावर आग्रही राहाल. मात्र कुणाच्या सांगण्यावरून मोठी गुंतवणूक करताना खबरदारी घ्यावी. दीर्घकालीन चिंता दूर होऊ शकते. सामाजिक क्षेत्रातील ओळखीचा लाभ मिळू शकतो. काही महत्त्वाचे काम पूर्ण झाल्याचा आनंद होईल. बुद्धिमत्तेचा आणि हुशारीचा फायदा मिळू शकेल. अनुभवी व्यक्तीचे मार्गदर्शन उपयुक्त ठरू शकते. एकंदरीत सुस्थिती राहील.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)