Daily Horoscope 28 May 2022: ‘या’ राशीला होईल धनलाभ, आरोग्याची काळजी घ्या, जाणून घ्या आजचं राशी भविष्य

Daily Horoscope 28 May 2022: ‘या’ राशीला होईल धनलाभ, आरोग्याची काळजी घ्या, जाणून घ्या आजचं राशी भविष्य

आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल ? आजचे तारे काय सांगतात. दैनिक राशी भविष्याद्वारे आजचे राशी भविष्य आणि दिवसातील घडामोडीची माहिती जाणून घ्या.

सिद्धी बोबडे

| Edited By: सिद्धेश सावंत

May 28, 2022 | 5:00 AM

मुंबई: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीची रास त्याच्या जन्मतारीख आणि जन्मवेळेवर आधारित असते. ज्योतिषशास्त्रात (Astrology) 27 नक्षत्र, 9 ग्रह आणि 12 राशींचे वर्णन केले आहे. याआधारावर व्यक्तीची रास (Zodiac) ठरवली जाते. आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? आजचे तारे काय म्हणतात? दैनिक राशिभविष्याद्वारे आजचे राशीभविष्य आणि संपूर्ण दिवसातील घडामोडींची माहिती जाणून घेवूया.

मेष (Aries) –

भावनिकदृष्ट्या खूप खंबीर व्हाल. माहितीपूर्ण आणि मनोरंजक कामात वेळ जाईल. कुटुंबासह धार्मिक स्थळांना भेट देण्याचा कार्यक्रमही आखला जाईल. तुमच्या व्यक्तिमत्त्वातही सकारात्मक बदल होईल.अचानक काही त्रास आणि समस्या उद्भवू शकतात. पण सावधगिरीने आणि काळजीपूर्वक दक्षतेने, तुम्ही यावरही मात कराल. नकारात्मक प्रवृत्ती असलेल्या लोकांच्या संपर्कात राहिल्याने तुमची बदनामी होऊ शकते. त्यामुळे असा लोकांपासून लांब राहणं कधीही चांगलां. कामात अधिक लक्ष देणं आवश्यक आहे. नोकरदारांना कामाच्या व्यापामुळे काहीसा मानसिक तणाव राहील. नोकरीत कामाच्या ठिकाणी  मतभेद आणि गैरसमज निर्माण होतील. पण, हे देखील निश्चित आहे की तुम्ही स्वतःहून परिस्थिती योग्य पद्धतीने  हाताळाल.

लव फोकस- कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. कुटुंबासोबत मनोरंजन आणि मौजमजेतही वेळ जाईल.

खबरदारी- नियमित योगा आणि व्यायाम करा. यामुळे आरोग्य चांगले राहील. कोणत्याही प्रकारची काळजी करू नका.जास्त विनाकारन टेंशन घेऊ नका.

शुभ रंग- पिवळा

भाग्यवान अक्षर –

अनुकूल क्रमांक – 3

वृषभ (Taurus) –

रिअल इस्टेट आणि गुंतवणूक यासारख्या कामांमध्ये दिवस बिझी राहील. तुम्हाला चांगली बातमीही मिळेल. तुम्ही प्रत्येक कामात रस घेऊन तुमच्या क्षमतेनुसार काम पूर्ण कराल. एकूणच टायमिंग चांगले आहे.सर्व काही ठीक झाल्यानंतरही काही नकारात्मक विचार मनात राहू शकतात. निसर्गरम्य ठिकाणी आणि ध्यानात थोडा वेळ घालवल्याने तुम्हाला शांती मिळेल. तरुणांनी करिअरशी संबंधित कामात अधिक लक्ष देण्याची गरज आहे.व्यवसायात वाढ होईल. एखादा महत्त्वाचा करारही होऊ शकतो. मार्केटिंगशी संबंधित कामात नुकसान होण्याची शक्यता आहे. पुढे ढकललेले बरे. नोकरदार लोकांची अधिकारी वर्गाशी असलेली मैत्री लाभदायक ठरेल.

लव फोकस- कौटुंबिक वातावरण सौहार्दपूर्ण राहील. प्रेमाच्या बाबतीत तुम्ही भाग्यवान असाल.

खबरदारी- आरोग्य काहीसे ढिले राहील. नकारात्मक विचारांमुळे आत्मविश्वास कमी होऊ शकतो.

शुभ रंग – आकाशी निळा

भाग्यवान अक्षर –

अनुकूल क्रमांक – 8

मिथुन (Gemini) –

तुम्ही स्वतःला मानसिकदृष्ट्या खंबीर कराल. तुमच्या व्यक्तिमत्त्वात बदल आणि  भर घालण्यासाठी तुम्ही विशेष काळजी घ्याल. एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीला भेटल्यानंतर लाभदायक योजनाही बनतील. सासरच्यांशी संबंध अधिक घट्ट होतील.पैशाच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची तडजोड करू नका. वाहन किंवा घर दुरुस्तीच्या कामावर जास्त खर्च झाल्यामुळे बजेट बिघडू शकते. तुमच्या नातेवाईकांशी चांगले संबंध ठेवण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील.कार्यक्षेत्रात कामाच्या ठिकाणी किंवा कार्यपद्धतीत काहीसा बदल करण्याची गरज आहे. आळस तुमच्यावर मात करू देऊ नका. ऑफिस आणि बिझनेस या दोन्ही ठिकाणी टीमवर्कने काम केल्याने चांगले यश मिळेल.

लव फोकस- कुटुंबासह आरामशीर गोष्टींसाठी खरेदी करण्यात वेळ जाईल. परंतु विवाहबाह्य संबंधांमुळे कुटुंबावर विपरीत परिणाम होऊ शकतो.

खबरदारी- खोकला, सर्दी इत्यादी वातावरणातील बदलामुळे आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात. अधिकाधिक आयुर्वेदिक गोष्टी खा.

शुभ रंग – निळा

भाग्यवान अक्षर –

अनुकूल क्रमांक – 8

हे सुद्धा वाचा

(टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा.)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें