Today Rashi Bhavishya: आज या चार राशींसाठी दिवस ठरणार धमाकेदार! नशिबाची साथ मिळणार की धन लाभ होणार? जाणून घ्या राशिभविष्य
Horoscope Today 25 October 2026: आज ग्रह-नक्षत्रांच्या स्थितीचा काही राशींवर शुभ प्रभाव पाहायला मिळू शकतो. आजचा दिवस ४ राशींसाठी आनंददायी ठरण्याची शक्यता असून, कामातील यश आणि आर्थिक बाबतीत सकारात्मक संकेत मिळू शकतात. जाणून घेऊया, आजचं राशीभविष्य

आज रविवार, २५ ऑक्टोबर २०२६. हिंदू धर्मात रविवार हा सूर्य देवाच्या उपासनेसाठी महत्त्वाचा मानला जातो. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी सूर्य देवाची पूजा केल्याने मान-सन्मान आणि आत्मविश्वास वाढतो. ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह-नक्षत्रांच्या स्थितीचा प्रत्येक राशीवर वेगवेगळा प्रभाव पडू शकतो. काही राशींना नोकरी, व्यवसाय आणि आर्थिक बाबतीत चांगले संकेत मिळू शकतात.
आजचा दिवस ४ राशींसाठी शुभ वार्ता घेऊन येणारा ठरेल. तर काहींनी निर्णय घेताना संयम राखणे आवश्यक आहे. जाणून घेऊया, आजचा दिवस मेष ते मीन या १२ राशींसाठी कसा असेल.
मेष
मन प्रसन्न राहील. आत्मविश्वासात काहीशी कमतरता जाणवू शकते. आई-वडिलांचे सहकार्य मिळेल. नोकरीत कामाचा विस्तार होऊ शकतो. आर्थिक बाबतीत चढ-उतार होऊ शकतात. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या.
वृषभ
आजचा दिवस सकारात्मक परिणाम देणारा ठरू शकतो. नोकरीत वरिष्ठांशी चांगले संबंध ठेवणे महत्त्वाचे आहे. प्रगतीच्या संधी मिळू शकतात. कामानिमित्त ठिकाण बदलण्याचेही संकेत आहेत. व्यवसायात यश मिळू शकते.
मिथुन
नोकरीत प्रगतीची संधी मिळू शकते. एखादी आनंदाची बातमी मिळाल्याने मन प्रसन्न होईल आणि आत्मविश्वास वाढेल. संयम राखणे आवश्यक आहे. मालमत्तेशी संबंधित बाबींमधून आर्थिक लाभ होऊ शकतो. मित्रांचे सहकार्य मिळेल.
कर्क
आज महत्त्वाचे निर्णय घेण्याची घाई टाळावी. विशेषतः आर्थिक व्यवहारांशी संबंधित निर्णय विचारपूर्वक घ्या. शैक्षणिक कामांमध्ये यश मिळू शकते. बौद्धिक कामांमधून उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. व्यवसाय निमित्त केलेला प्रवास लाभदायक ठरू शकतो. रागावर नियंत्रण ठेवा.
सिंह
मन काहीसे अस्वस्थ राहू शकते. आत्मविश्वासात कमतरता जाणवली तरी कुटुंबीयांचे सहकार्य मिळेल. कुटुंबासोबत धार्मिक स्थळी जाण्याचा योग येऊ शकतो. आरोग्याची काळजी घ्या. अनामिक भीती सतावू शकते. नोकरीत चढ-उतारांचा सामना करावा लागू शकतो.
कन्या
बोलण्यात गोडवा राहील. मात्र मनात अस्वस्थता असू शकते. आईचे सहकार्य मिळेल. वडील आणि जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. व्यावसायिकांना व्यवसायाचा विस्तार करण्याच्या संधी मिळतील. मात्र, यासाठी धावपळ करावी लागू शकते.
तूळ
रागावर नियंत्रण ठेवून संवाद साधताना समतोल राखणे महत्त्वाचे आहे. कौटुंबिक जीवन आनंदी राहिल. मित्रांचे सहकार्य मिळेल. जुन्या मित्राची भेट होऊ शकते. आर्थिक प्रगतीसाठी अनुकूल दिवस.
वृश्चिक
कला आणि संगीताविषयी आवड वाढू शकते. बौद्धिक कामांमध्ये व्यस्तता वाढेल. उत्पन्नाचे नवे मार्ग उपलब्ध होतील. व्यवसायात बदल करण्याचा विचार करू शकता. विद्यार्थ्यांसाठी दिवस अनुकूल आहे. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा.
धनु
आज चढ-उतार जाणवू शकतात. आर्थिक बाबतीत काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कुटुंबीयांचे सहकार्य मिळेल. नोकरीत वरिष्ठांकडून मदत होण्याची शक्यता आहे. कामाचा विस्तार होऊ शकतो. मात्र त्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागू शकते.
मकर
आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. मात्र, काही कारणांमुळे मन अस्थिर राहू शकते. आत्मविश्वासात कमतरता जाणवू शकते. कुटुंबात धार्मिक कार्य घडू शकते. एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीकडून आर्थिक मदत मिळण्याची शक्यता आहे. वाढत्या खर्चामुळे चिंता वाढू शकते.
कुंभ
आत्मसंयम राखणे आवश्यक आहे. आत्मविश्वास कमी जाणवू शकत. रागावर नियंत्रण ठेवा. कुटुंबातील शांतता जपण्याचा प्रयत्न करा. नोकरीत अतिरिक्त जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी मिळालेली कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी लक्ष केंद्रित करा.
मीन
मन काहीसे अस्वस्थ राहू शकते. आत्मविश्वासात कमतरता जाणवली तरी बोलताना संयम राखणे महत्त्वाचे आहे. नोकरीत प्रगतीच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. उत्पन्न वाढण्याची शक्यता असून, जवळच्या व्यक्तींची साथ मिळेल. प्रवासही लाभदायक ठरू शकतो.
(डिस्क्लेमर: सदर लेखातील माहिती केवळ ज्योतिषशास्त्रीय गृहीतके आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. आम्ही यातील तथ्यांची किंवा दाव्यांची पुष्टी करत नाही. अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही.)