धनू राशीचं आजचं राशीफळ, 23 जुलै: कुठली समस्या भेडसावत असेल तर वरिष्ठांचा सल्ला घ्या, प्रवास टाळा

| Updated on: Jul 23, 2021 | 10:35 AM

Saggitarius aaj che rashifal Horoscope Today 23 July 2021: तुम्ही ज्या व्यवसायाशी संबंधीत आहात, त्याचे सकारात्मक निर्णय येतील. आर्थिक स्थितीही मजबूत होईल. जो व्यवसाय भागिदारीत करताय त्यात लाभ मिळेल

धनू राशीचं आजचं राशीफळ, 23 जुलै: कुठली समस्या भेडसावत असेल तर वरिष्ठांचा सल्ला घ्या, प्रवास टाळा
Todays Rashifal for Saggitarius
Follow us on

Horoscope 23July, 2021:
तुमचा आजचा दिवस कसा असणार आहे? धनू राशीवाल्यांना आज काय काय उपाय करायला हवेत ज्यामुळे त्यांचा
दिवस शुभ असेल. एवढच नाही तर काय केलं पाहिजे म्हणजे आजच्या दिवशी नुकसान होणार नाही. कुठल्या गोष्टींपासून
सावध राहीलं पाहिजे? आजच्या दिवशी तुमच्यासाठी कोणता रंग, कोणता नंबर आणि कोणतं अक्षर शुभ असेल हे सगळं
जाणून घेऊयात. पाहुयात 23 जुलैचं राशीफळ काय आहे.

Saggitarius Rashifal(धनू राशीफळ) 23 जुलै-
सकारात्मक दृष्टीकोन ठेवून काम करा, पूर्ण मनानं मेहनत करा, तुमच्या अनेक समस्यांचं निराकरण होईल. अचानक
तुमचे थांबलेला पेमेंट येऊ शकतो, त्यामुळे तुम्हाला छान वाटेल. सुटकेचा नि:श्वास टाकाल.

कुठलीही समस्या भेडसावत असेल तर वरिष्ठांचा सल्ला लाभदायक ठरू शकतो. यावेळेस मनाचं फार ऐकण्यापेक्षा
मेंदूचं ऐका. डोकं काय सांगतंय त्याला प्राथमिकता द्या. आज प्रवास टाळा, यात्राही करु नका. कुठलाच सकारात्मक
परिणामाची शक्यता नाही.

प्रॉपर्टी संबंधी व्यवसायात सकारात्मक निर्णय येतील. आर्थिक स्थितीही बरीचशी सुधारेल. जो व्यवसाय भागीदारीत
करताय त्यात लाभ मिळेल. कोणताही निर्णय घेताना पार्टनरची मदत नक्की घ्या.

लव फोकस-
कौटुंबिक जीवन आणि व्यवसायिक समस्यांना तुमच्यावर हावी होऊ देऊ नका. प्रेम संबंधात एक दुसऱ्यांच्या
भावनांचा आदर करा.

सावध-
तब्येत चांगली होईल. महिलांनी स्वत:च्या तब्येतीकडे जास्त लक्ष द्यावं.

लकी कलर-वांगी
लकी अक्षर– र
फ्रेंडली नंबर– 9

(Todays horoscope for Sagittarius July 23 know all in Marathi)

लेखक अजय भांबी-
डॉ. अजय भांबी हे ज्योतिषमधलं नावाजलेलं व्यक्तीमत्व आहे. डॉ. भांबी हे नक्षत्र ध्यानचे जाणकार आणि उपचारकर्ता
आहेत. एक ज्योतिषी म्हणून अजय भांबींना जग ओळखतं. इंग्रजी आणि हिंदी भाषेत अनेक पुस्तकांचं लिखाण केलं.
अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्रांसाठी लेखही लिहितात. थायलंडच्या उपपंतप्रधानांकडून बँकॉकमध्ये त्यांना
World Icon Award 2018 सन्मानित करण्यात आलं आहे.