
कधीकधी तुम्ही ज्या ठिकाणी काम करताय तो ऑफिसचा परिसर तुम्हाला फारच नकारात्मक वाटतो. ऑफिसच्या आवारात गेलं की तुम्हाल तणावग्रस्त असल्यासारखं वाटतं. काहीही कारण नसताना तुमचं तुमच्या सहकाऱ्यांशी भांडण होतं. ऑफिसमध्ये एवढा ताण वाढतो की त्याचा राग घरातही निघतो. तुमच्यासोबत असं काही घडत असेल तर वेळीच विचार करणं गरजेचं आहे. कधी-कधी तुम्ही ऑफिसमध्ये अशा काही चुका करता, ज्यामुळे तुम्हाला हे सर्वकाही भोगावं लागतं. या संभाव्य चुका काय आहेत? तणावातून मुक्त होण्यासाठी तुम्ही काय करायला हवं? हे जाणून घेऊ या..
ऑफिसमध्ये कामाचे ठिकाण निवडण्याबद्दल काही काळजी घेतली तर कदाचित तुमची या ताण-तणावापासून सुटका होऊ शकते.
तुम्ही ऑफिसमध्ये ज्या ठिकाणी बसता, त्या ठिकाणाच्या अगदी समोर दरवाजा असेल तर तुम्ही थोडी काळजी घ्यायला हवी. खुर्चीवर बसल्यानंतर तुमच्या चेहऱ्यापुढे थेट दरवाजा येत असेल तर हे कारण तुमच्या प्रगतीत बाधा ठरू शकतं. तुमच्या हातातून चांगले-चांगले प्रोजेक्ट सुटू शकतात. विशेष म्हणजे तुमचे ऑफिसमधील सोबतही तुमच्यापासून दूर जाऊ शकतात.
ऑफिसमध्ये तणावग्रस्त राहणे, उत्साह नाहीसा होणे याला तुमचा डेस्कही काही प्रमाणात कारणीभूत ठरू शकतो. तुमचा डेस्क कॉरिडोअरमध्ये असेल तर काळजी घ्यावी. तुमचा डेस्क एखाद्या कोपऱ्यात असला तरी तुम्ही तुम्ही काळजी घ्यायला हवी. तुमचा डेस्क कॉरिडोअरमध्ये असेल तर तुम्ही ज्या प्रोजेक्टवर काम करताय त्यात तुम्हाला अपयश येऊ शकतं किंवा तुम्हाला तुमच्या बॉसकडून शाब्बासकी मिळणेही बंद होऊ शकते. अशा ठिकाणावर डेस्क असेल तर तुमचा आत्मविश्वासही कमी होऊ शकतो.
तुम्ही ऑफिसमध्ये बसताना कोणत्या दिशेने बसताय याचीही काळजी घेणे गरजेचे आहे. वास्तूशास्त्रानुसार उत्तर आणि पूर्व दिशेला बसणे शूभ मानले जाते. ज्या ठिकाणी वॉशरूम आहे किंवा पायऱ्या आहेत त्या ठिकाणी डेस्क असणे अशूभ मानले जाते. तुमचे ऑफिस अशा ठिकाणी असेल तर तुमच्यात नकारात्मक उर्जा निर्माण होऊ शकते. त्यामुळे ऑफिसमध्ये जागा निवडताना योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे.
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.