Vastu Tips : चुंबकाप्रमाणे धन खेचते हे चमत्कारीक झाड, आर्थीक अडचणीतून जात असाल तर अवश्य करा हा उपाय

| Updated on: Feb 22, 2023 | 5:46 PM

वास्तूमध्ये असे अनेक उपाय सांगण्यात आले आहेत, ज्याद्वारे जीवनातील समस्या कमी केल्या जाऊ शकतात. वास्तूनुसार घर किंवा ऑफिसमध्ये काही झाडे लावल्याने जीवनात सुख-शांती येते.

Vastu Tips : चुंबकाप्रमाणे धन खेचते हे चमत्कारीक झाड, आर्थीक अडचणीतून जात असाल तर अवश्य करा हा उपाय
क्रॅसुला
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : घराच्या सुख, शांती आणि प्रगतीमध्ये वनस्पतींचाही मोठा वाटा असतो. वास्तुशास्त्रात प्रत्येक वनस्पतीचे वेगवेगळे महत्त्व सांगितले आहे. आपल्या कुटुंबात सुख-समृद्धी यावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे आरोग्य चांगले रहावे आणि त्याला कधीही आर्थिक तंगीचा सामना करावा लागू नये यासाठी प्रत्येक व्यक्ती रात्रंदिवस परिश्रम करतो, परंतु काही वेळा प्रयत्न करूनही समस्यांपासून सुटका मिळत नाही. अशा परिस्थितीत तुम्ही वास्तूची (Vastu Tips Marathi) मदत घेऊ शकता. वास्तूमध्ये असे अनेक उपाय सांगण्यात आले आहेत, ज्याद्वारे जीवनातील समस्या कमी केल्या जाऊ शकतात. वास्तूनुसार घर किंवा ऑफिसमध्ये काही झाडे लावल्याने जीवनात सुख-शांती येते. यापैकी एक झाड म्हणजे क्रॅसुला. (Crassula Plant)

घरामध्ये मनी प्लांट लावल्याने आर्थिक समृद्धी वाढते हे बहुतेक लोकांना माहित आहे, तर घरात क्रॅसुला वनस्पती देखील खूप चांगले असे म्हटले जाते. वास्तुशास्त्रानुसार, मनी प्लांटपेक्षा क्रॅसुला झाड हे चांगला प्रभाव दाखवते. चला तर मग जाणून घेऊया वास्तुशास्त्रानुसार क्रॅसूलाचे फायदे आणि ते झाड ठेवण्याची योग्य दिशा.

अत्यंत शुभ आहे क्रॅसुला वनस्पती

वास्तुशास्त्रात क्रॅसुला वनस्पती अतिशय शुभ आणि लाभदायक मानली गेली आहे. हे झाड घरात लावल्यानं व्यक्तीच्या आर्थिक समस्या दूर होतात. तसेच संपत्तीचे नवे मार्ग खुले होतात. आपल्याकडे जसे वास्तुशास्त्र आहे, तसेच चीनमध्ये फेंगशुई आहे. फेंगशुईच्या मते, क्रॅसुला हे असं झाड आहे की ते घरात लावल्यानं आर्थिक परिस्थीत सुधारते. घर किंवा कार्यालयात हे झाड लावल्याने सकारात्मक उर्जा संचारते. जर तुमच्याकडे पैसा असेल, पण पैसा टिकत नसेल तर तुम्ही क्रॅसुला लावू शकता.

हे सुद्धा वाचा

क्रॅसुलाचे फायदे

क्रॅसुला झाड घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करते आणि सकारात्मक ऊर्जा प्रवाहित करते. यासोबतच या झाडामुळे व्यक्तीच्या आर्थिक समस्याही दूर होतात. नोकरीतही प्रमोशनचे मार्ग लवकरच खुले होतील.

क्रॅसुला झाड लावण्यासाठी योग्य दिशा

क्रॅसुला रोप लावणं खूप शुभ आहे. वास्तुशास्त्रानुसार प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला क्रॅसुला झाड ठेवा. याशिवाय तुम्ही ते तुमच्या ऑफिसच्या डेस्कवरही ठेवू शकता.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)