Vastu Tips: कुटुंबियातील सदस्य सतत आजारी पडत असेल तर घरात असू शकतो वास्तुदोष, करा हे उपाय

| Updated on: Jul 23, 2022 | 9:23 AM

अनेकांच्या घरात असं होतं की, आजारपण एकदा घरात आलं की ते बाहेर जात नाही. यामध्ये कुटुंबातील सदस्य एकामागून एक आजारी पडतात.एखादी व्यक्ती अधूनमधून आजारी पडणं आपण सामान्य असते. समस्या तेव्हा समोर येते ज्यावेळी एकदा आजार घरात शिरतो मात्र तो बाहेर पडण्याचं नाव घेत नाही.  वास्तू  आणि स्वास्थ याचा परस्परांशी जवळचा संबंध आहे.  वास्तुशास्त्रात (Vastushastra) नमूद […]

Vastu Tips: कुटुंबियातील सदस्य सतत आजारी पडत असेल तर घरात असू शकतो वास्तुदोष, करा हे उपाय
Follow us on

अनेकांच्या घरात असं होतं की, आजारपण एकदा घरात आलं की ते बाहेर जात नाही. यामध्ये कुटुंबातील सदस्य एकामागून एक आजारी पडतात.एखादी व्यक्ती अधूनमधून आजारी पडणं आपण सामान्य असते. समस्या तेव्हा समोर येते ज्यावेळी एकदा आजार घरात शिरतो मात्र तो बाहेर पडण्याचं नाव घेत नाही.  वास्तू  आणि स्वास्थ याचा परस्परांशी जवळचा संबंध आहे.  वास्तुशास्त्रात (Vastushastra) नमूद केल्यानुसार, तुमच्या घरातील वास्तू दोष (Vastu dosh) देखील कुटुंबातील सदस्यांच्या खराब आरोग्यास कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे यावर वेळीच उपाय करायला हवा. जाणून घेऊया उपाय.

हॉलमध्ये हनुमानाचा फोटो लावा

 

वास्तुशास्त्रानुसार, भगवान हनुमान हे सर्व अडथळे दूर करणारे देवता मानले जातात. त्यांच्या शक्ती आणि तेज समोर, नकारात्मक शक्ती निस्तेज होतात आणि घरातील कोणाचंही नुकसान करू शकत नाहीत. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांना आजारापासून वाचवण्यासाठी घराच्या मुख्य हॉलमध्ये हनुमानाचा फोटो लावा.

हे सुद्धा वाचा

 

खांब किंवा मोठं असल्यास झाड काढून टाका

जर तुमच्या घरासमोर खांब किंवा मोठे झाड असेल तर ते तुमच्या घरातील सकारात्मक उर्जेच्या प्रवाहात अडथळा बनतं. अशा परिस्थितीत, त्यांना वेळीच काढून टाकणं योग्य ठरेल. जर तुम्ही हे देखील करू शकत नसाल तर त्या झाडांसमोर किंवा खांबांसमोर आरसा लावा. असं मानलं जातं की, यामुळे घरातील वास्तुदोष दूर होतात.

 

घराच्या मध्यभागी जास्त सामान नका ठेवू

 

कोणत्याही घराचा मधील भाग उघडा असतो. अशावेळी अनेकजण या मोकळ्या जागेत जास्तीत जास्त सामान ठेवतात. मात्र वास्तुशास्त्रानुसार, सकारात्मक ऊर्जा घराच्या मध्यभागी सर्वात कमी असते. अशा स्थितीत तिथे वस्तूंचा ढीग ठेवला तर ती ऊर्जा आणखी कमी होते. अशा परिस्थितीत जर आपण घराच्या मध्यभागी सामान ठेवले असेल तर ते ताबडतोब काढून टाका, जेणेकरून संपूर्ण घरात सकारात्मक उर्जेचा प्रवाह राहील.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)