Special Story | लातूर पॅटर्न, रितेश देशमुखचं गाव ते राष्ट्रकुटांचं घर, लातूर जिल्ह्याच्या ‘या’ रंजक गोष्टी माहिती आहेत का ?

| Updated on: Aug 17, 2021 | 8:10 AM

लातूर जिल्ह्याला मोठा ऐतिहासिक वारसा आहे. हा जिल्हा राष्ट्रकूटांचे घर होते तसेच या जिल्ह्यावर हामनी शासक, आदिल शाही आणि मुघल यांनी शासन केले.

Special Story | लातूर पॅटर्न, रितेश देशमुखचं गाव ते राष्ट्रकुटांचं घर, लातूर जिल्ह्याच्या या रंजक गोष्टी माहिती आहेत का ?
NANDED DISTRICT ALL INFORMATION IN MARATHI
Follow us on

मुंबई : शिक्षण क्षेत्रातील लातूर पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. शिकविण्याच्या विशेष पद्धतीमुळे डॉक्टर तसेच इंजिनिअर होण्याचं स्वप्न उराशी बाळगणारे विद्यार्थी हमखास लातूरची वाट धरतात. पण फक्त शिक्षण क्षेत्रातच अग्रेसर असलेला जिल्हा अशी लातूरची ओळख नाही. तर या जिल्ह्याला मोठा ऐतिहासिक वारसा आहे. हा जिल्हा राष्ट्रकूटांचे घर होते तसेच या जिल्ह्यावर हामनी शासक, आदिल शाही आणि मुघल यांनी शासन केले. (Latur district all information in Marathi know about tourist places temples and history of Latur district in special report)

♦ लातूर जिल्ह्याचा इतिहास

या जिल्ह्याविषयी सांगायचं झालं तर त्याची निर्मिती 15 ऑगस्ट 1982 रोजी उस्मानाबादचे विभाजन होऊन झाली. यापूर्वी या भागावर निजामांचे राज्य होते. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर तसेच हैदराबाद संस्थान भारतात विलीन करण्यात आल्यानंतर लातूर जिल्ह्याचा भाग तत्कालीन बॉम्बे प्रांताचा हिस्सा बनला. नंतर 1960 मध्ये बॉम्बे प्रांत एक जिल्हा झाले. पुढे 1982 साली उस्मानाबाद जिल्ह्याचे विभाजन होऊन लातूर जिल्ह्याची निर्मिती झाली. या भागावर सातवाहन, शक, चालुक्य, देवगिरीचे यादव, दिल्लीचा सुलतान, दक्षिण भारतातील बहामनी शासक, आदील शाही आणि मुघल यांनी शासन केले.

लातूर जिल्ह्यात एकूण 10 तालुके आहेत.

♦ लातुर

♦ अहमदपूर

♦ उद्गीर

♦ औसा

♦ चाकूर

♦ देवणी

♦ निलंगा

♦ रेणापूर

♦ शिरूर

♦ शिरुरअनंतपाळ

♦ जिल्ह्याची भौगोलिक आणि सांख्यिक माहिती

लातूर जिल्ह्याच्या पूर्वेकडील बाजूस कर्नाटकातील बिदर जिल्हा आहे. तर नांदेड जिल्हा पूर्वोत्तर आहे. उत्तरेकडे परभणी जिल्हा आहे. लातूर हा संपूर्ण जिल्हा बालाघाट पठारावर आहे. तो समुद्र सपाटीपासून 540 ते 638 मीटर उंचीवर आहे. जिल्ह्यातील मुख्य नदी मांजरा आहे. तेरना, तावरजा, घर्नी या उपनद्या आहेत. लातूर जिल्ह्याचे क्षेत्रफळ 7157 चौरस किमी आहे. जिल्ह्याला पाच उपविभाग आणि 10 तालुक्यांमध्ये विभागण्यात आलंय. 2011 च्या जनगणनेनुसार लातूर जिल्ह्यातील गावांची संख्या 948 आहे. या जिल्ह्याचा साक्षरता दर 77.26 % आहे. हा जिल्हा हवाई मार्गे मुंबईशी जोडण्यात आलेला आहे. या जिल्ह्यात प्रमुख शहरी केंद्रे अहमदपूर, औसा, लातूर, निलंगा, उदगीर आहेत. तसेच येथील मुख्य पिकं तृणधान्ये, तेलबिया, डाळी, द्राक्षे आदी आहेत. या जिल्ह्यात 10 पंचायत समित्या आहेत.

♦ लातूर जिल्ह्यातील पर्यटन स्थळे

लातूरमध्ये व्रिंदवन पार्क, उदगीर हत्तीबेट, खरोसा लेणी, औसाचा किल्ला, उदगीर किल्ला ही काही पर्यटनस्थळे पाहण्यासारखी आहेत.

 व्रिंदवन पार्क, चाकूर हे ठिकाणी लातूर शहरापासून सुमारे 35 किमी अंतरावर आहे. लातूर-नांदेड या राज्य महामार्गावर हे स्थान स्थित आहे. या ठिकाणी एक पवित्र असे शिवमंदीर आहे. तसेच येथे विरंगुळ्यासाठी एक उद्यानदेखील आहे.

 उदगीर हत्तीबेट-देवर्जन जिल्ह्याच्या उदगीर तालुक्यात हत्ती बेट नावाचं प्रसिद्ध असं ठिकाण आहे. उदगीर शहराच्या पश्चिमेस 16 किमी अंतरावर हे ठिकाण आहे. या ठिकाणी पुरातन मंदिरं आहेत. तसेच येथे कोरीव शिल्प मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. हत्ती बेट देवर्जनाला प्रादेशिक पर्यटनाचा दर्जा मिळाला आहे. मराठवाडा मुक्ती संग्राममध्ये रझाकारांविरुद्ध स्वातंत्र्य सैनिकांनी युद्ध केलं. मात्र, स्वातंत्र्य सैनिकांनी हत्ती बेट रझाकारांना शेवटपर्यंत जिंकू दिला नव्हता असं सांगितलं जातं. पौर्णिमेला इथं भजन, कीर्तन आणि प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो.

खरोसा लेणी- हे स्थळ लातूर जिल्ह्यापासून 45 किमी अंतरावर आहे. खरोसा या छोट्या गावात या लेण्या आहेत. येथे एकूण 12 लेणी आहेत. पहिल्या गुहेत भगवान बुद्ध आहेत. यामध्ये भगवान बुद्ध बसलेल्या स्थितीत आढळतात.

औसाचा किल्ला- औसा तालुक्यात हा किल्ला आहे. हा किल्ला ई.स. 1200 मध्ये विकसित केला गेला होता .

उदगीर किल्ला- उदगीर तालुक्यात हा किल्ला आहे. बाराव्या शतकात हा किल्ला बांधला गेला. या किल्ल्याला जोडणारा एक भुयारी मार्ग आहे. किल्ल्याच्या परिसरात सामुद्रधुनीय महंतांची समाधी आहे. तसेच येथे खंदक तसेच महलसुद्धा आहे.

♦ लातूर जिल्ह्यात पर्यटनस्थळांसोबतच अनेक धार्मिक स्थळे 

लातूर जिल्ह्यात पर्यटनस्थळांसोबतच अनेक धार्मिक स्थळे आहेत. जगदंबामाता मंदिर गंजगोलाई, सूरत शावली दर्गा, सिद्धेश्र्वर आणि रत्नेश्वर मंदिर, श्री केशव बालाजी मंदिर, बुद्ध गार्ड्न (मंदिर), श्री विराट हनुमान मंदिर अशी विविध धार्मिक स्थळे या जिल्ह्यात आहेत. या धार्मिक स्थळांचे स्थापत्य शास्त्र पाहण्यासारखे आहे. येथील भक्तीमय वातावरण पाहू आपण मनात प्रचंड उर्जा घेऊन परत येतो.

♦ रितेश देशमुख याच जिल्ह्याचा

या जिल्ह्याविषयीची सर्वात दुखद आणि वाईट घटना म्हणजे किल्लारी भूकंप 1993 मध्ये या जिल्ह्यात किल्लारी येथे अतिशय भीषण असा भूकंप आला होता. या भूकंपात जवळपास तीस हजार लोक मृत्युमुखी पडले होते. असे असले तरी या जिल्ह्याचे इतरही अनेक वैशिष्ये आहेत. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख तसेच प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख हे याच जिल्ह्याचे आहेत. या जिल्ह्यातील पर्यटनस्थळे पाहण्यासाठी तसेच येथील संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी एकदातरी या जिल्ह्याला भेट दिलीच पाहिजे.

इतर बातम्या :

Special Story | औरंगजेबाची राजधानी, ताजमहलची प्रतिकृती, वेरुळ-अजिंठा लेण्यांचं वैभव, जाणून घ्या औरंगाबाद जिल्ह्याच्या माहीत नसलेल्या गोष्टी

special story | नेमगिरीपासून ते संतांच्या भूमीपर्यंत, परभणी जिल्ह्याच्या ‘या’ गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का ?