Special Story | औरंगजेबाची राजधानी, ताजमहलची प्रतिकृती, वेरुळ-अजिंठा लेण्यांचं वैभव, जाणून घ्या औरंगाबाद जिल्ह्याच्या माहीत नसलेल्या गोष्टी

औरंगाबाद जिल्हा म्हटलं की वेरुळ-अजिंठा, बिबी का मकबरा अशी दोन-तीन पर्यटनस्थळं आपल्या नजरेसमोर येतात. मात्र, त्या व्यतीरिक्तही या जिल्ह्यात अनेक आकर्षक आणि कुतूहल निर्माण करणाऱ्या गोष्टी आहेत.

Special Story | औरंगजेबाची राजधानी, ताजमहलची प्रतिकृती, वेरुळ-अजिंठा लेण्यांचं वैभव, जाणून घ्या औरंगाबाद जिल्ह्याच्या माहीत नसलेल्या गोष्टी
AURANGABAD DISTICT INFORMATION
Follow us
| Updated on: Aug 10, 2021 | 1:22 AM

मुंबई : राज्याची पर्यटन राजधानी म्हणून ओळख असलेला जिल्हा म्हणजे औरंगाबाद. या जिल्ह्यामध्ये एकापेक्षा एक पर्यटनस्थळं आहेत. ऐतिहासिक ठेवा आणि भविष्याचा वेध असलेला हा जिल्हा आहे. औरंगाबाद जिल्हा म्हटलं की वेरुळ-अजिंठा, बिबी का मकबरा आशी दोन-तीन पर्यटनस्थळं आपल्या नजरेसमोर येतात. मात्र, त्या व्यतीरिक्तही या जिल्ह्यात अनेक आकर्षक आणि तुमचं कुतूहल निर्माण करणाऱ्या गोष्टी आहेत. याच गोष्टींविषयी तसेच जिल्ह्याची संपूर्ण माहिती आपण या स्पेशल स्टोरीमध्ये जाणून घेऊया. (detail information of Aurangabad district know about tourist places rivers and talukas)

  जिल्ह्याचं क्षेत्रफळ किती ? भौगोलिक स्थिती काय ?

औरंगाबाद जिल्हा एकूण 10,100 चौ.कि.मी मध्ये विस्तारलेला आहे. त्यापैकी 141.1 चौ. कि.मी. शहरी तर 9587 चौ. कि.मी. ग्रामीण क्षेत्र आहे. या जिल्ह्याला मोठा सांस्कृतिक वारसा आहे. जिल्ह्यात एकूण वनक्षेत्र 135.75 चौ.कि.मी. आहे. महाराष्ट्राशी तुलना केल्यास औरंगाबादचे जंगल क्षेत्र 9.03% आहे. औरंगाबादेत गोदावरी, तापी, पूर्णा, शिव, खाम अशा मुख्य नद्या आहेत. तर दुधा, गलहती आणि गिरजा या उपनद्या आहेत. या जिल्ह्यात पावसाळी हंगाम हा जून ते सप्टेंबर महिना असा आहे. तर ऑक्टोबर ते फेब्रुवारी या चार महिन्यांत हिवाळी हंगाम असतो. 2011 च्या जनगणनेनुसार औरंगाबाद जिल्ह्याची एकूण लोकसंख्या 37,01,282 असून येथे मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू या भाषा बोलल्या जातात.

औरंगाबाद जिल्ह्यातील तालुके

♦ औरंगाबाद

♦  खुलताबाद

♦  सोयगाव

♦  सिल्लोड

♦  गंगापूर

♦  कन्नड

♦  फुलंब्री

♦  पैठण

♦  वैजापूर

♦ औरंगाबाद शहर कसं उदयास आलं ?

औरंगाबाद शहराच्या निर्मितीचा इतिहास मोठा रंजक आहे. हे शहर 1610 मध्ये निजामशाहाचा सरदार मलिक अंबर याने वसवले. या शहराला 52 दरवाजांचे शहर म्हटले जाते. या शहराला पूर्वी खडकी असं म्हटलं जायचं. मुघल बादशाहा औरंगजेबाने आपली राजधानी औरंगाबादला आणली तेव्हा या शहरात अनेक बदल करण्यात आले. औरंगजेबाने त्याच्या राजधानीचे संरक्षण व्हावे म्हणून 54 रस्ते भिंतीच्या साहाय्याने जोडले. तसेच सन 1682 मध्ये मराठ्यांपासून संरक्षण व्हावे म्हणून मोठी भिंत बांधली गेली. तसेच पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून 14 नहरी बांधल्या गेल्या. विशेष म्हणजे औरंगजेब त्याच्या मृत्यूपर्यंत औरंगाबाद शहरातच राहिला. 17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद निजामांपासून मुक्त झाले. त्यानंतर औरंगाबाद जिल्ह्यासह मराठवाडा तत्कालीन बॉम्बे राज्यात विलीन करण्यात आला. त्यानंतर औरंगाबादची स्वतंत्र ओळख निर्माण झाली.

जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

◊अजिंठा – वेरूळ लेण्या : 5 व्या तसेच 8 व्या शतकात या लेण्या गुफेत साकारण्यात आलेल्या आहेत.

दौलताबाद किल्ला : मोहम्मद तुघलकाची राजधानी या ठिकाणी होती.

खुलताबाद : या शहरात मुघल बादशाहा औरंगजेबाची कबर आहे

बीबी का मकबरा : बेगम राबीयाची (बादशहा औरंगजेबाच्या पत्नीची) कबर येथे आहे. ताजमहलची ही प्रतिकृती आहे.

घृष्णेश्वर मंदीर : हे बरा ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणजेच बारावे ज्योतिर्लिंग आहे

पाणचक्की

पैठण : हे संत एकनाथ यांचे गाव आहे. येथे मोठी संत परंपरा तुम्हाला दिसेल.

जायकवाडी धरण 

औरंगाबाद गुफा आणि औरंगाबाद लेणी

५२ दरवाजे

♦  शहराला भेट कशी द्याल ?

या शहराला भेट द्यायची असेल तर लोहमार्ग, हवाईमार्ग, तसेच रस्तेमार्ग उपलब्ध आहेत. हवाईमार्गाद्वारे शहरात यायचे असल्यास मुंबई-औरंगाबाद, तसेच दिल्ली-मुंबई-औरंगाबाद असा पर्याय उपलब्ध आहे. या जिल्ह्याची संस्कृती, परंपरा यांचा अभ्यास करण्यासाठी या शहराला एकदातरी भेट द्यायला हवी.

इतर बातम्या :

VIDEO: मलंगगड भागात तरुणांचे जीवघेणे स्टंट, पोलिसांसमोर मोठं आव्हान

रहस्यमयी फूल… या फुलाला पाहण्यासाठी लाखो रुपये खर्च करून पर्यटक केरळात का येतात? वाचा!

(detail information of Aurangabad district know about tourist places rivers and talukas)
Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.