
गेल्या काही दशकांपासून The Simpsons नावाचं कार्टुन लोकांचं मनोरंजन करत आहे. पण तुम्हाला माहिती आहे का The Simpsons कार्टुन फक्त कॉमेडीसाठी नाही तर, भविष्यवाण्यांमुळे देखील प्रसिद्ध आहे. शोमध्ये दाखवण्यात आलेल्या काही घटना अनेक वर्षांपूर्वीच्या आहेत असं सांगितलं जातं. ज्या वेळ आल्यानंतर सत्य घडल्या. अशा अनेक घटना खऱ्या असल्याने, लोकं याा कार्टुनमध्ये सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवतात. या कार्टूनने 2025 बद्दल काय भाकिते केली आहेत ते जाणून घेऊया.
The Simpsons कार्टुनच्या सीझन 11, एपिसोड 17 मध्ये 2025 मध्ये इस्रायल आणि इराणमध्ये तणावपूर्ण परिस्थिती असल्याचं दाखवलं आहे, जे आजच्या काळात खरे असल्याचं दिसत आहे. इराण आणि इस्रायलमधील संघर्ष The Simpsons कार्टूनमध्ये आधीच दाखवण्यात आलेला. सध्या इस्रायल आणि इराणमध्ये तणावपूर्ण वातावरण आहे.
The Simpsons कार्टुनच्या सीझन 23, एपिसोड 17 मध्ये एक झलक दाखवण्यता आली आहे. ज्यामध्ये रोबोट आणि आर्टिफिशियल इंटेलिजेन्सचा (AI) प्रभाव दिसून येत आहे. या भागात, अणुऊर्जा प्रकल्पात मानवांऐवजी रोबोट काम करताना दाखवले आहेत. तसेच, एआय इतकं प्रगत झालं आहे हे दाखवलं आहे.
The Simpsons कार्टुनच्या 2016 च्या त्या 28 व्या सीरिज, एपिसोड 2 मध्ये प्रोफेसर फ्रिंक यांना त्यात व्हर्च्युअल रिअॅलिटी हेडसेट सादर करताना दाखवण्यात आलं. हे दृश्य केवळ कल्पनारम्य नव्हतं, तर 2025 मध्ये अॅपलने प्रत्यक्षात व्हिजन प्रो जगासमोर आणलं.
गेल्या काही वर्षांत, The Simpsons कार्टूनने त्याच्या काही धक्कादायक भविष्यवाण्यामुळे खळबळ माजवली आहे, जे वास्तविक जगाच्या घटनांशी आश्चर्यकारकपणे साम्य आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांचे अध्यक्षपद आणि डिस्नेने फॉक्सचे अधिग्रहण करणे यासारख्या प्रसिद्ध भाकितांव्यतिरिक्त, The Simpsons ने पूर्वी भाकीत केलेल्या इतर अनेक घटना घडल्या आहेत.
सांगायचं झालं तर, भविष्यात पुढे काय होणार याबद्दल सर्वांनात उत्सुकता असते. अनेक जण सतत राशीभविष्य वाचतात. तर काही कुंडलीवर विश्वास ठेवतात. एवढंच नाही तर, देशात किंवा जगात काही मोठ्या घडल्या नंतर पूर्वी केलेल्या भविष्यवाण्या समोर येतात. ज्यामुळे अंगावर काटा येतो.