Chanakya Niti | आचार्य चाणक्यांच्या मते घवघवीत यश हवं असेल तर ‘या’ गोष्टींची काळजी घ्या

| Updated on: Feb 22, 2022 | 9:05 AM

मुंबई :  आचार्य चाणक्य (Acharya Chankaya) यांचे शब्द आणि विचार आजही खूप प्रभावी मानले जातात. जर आजही या गोष्टींचे पालन केले तर आपण सुखी आयुष्य जगू शकतो. आपल्या व्यस्त जीवनातील टिप्स धावपळीच्या जीवनात, चाणक्याच्या शब्दांकडे आपण दुर्लक्ष करतो. परंतु जर ते योग्यरित्या पाळले गेले तर यश आपलेच असते. आयुष्यात माणसाने जीवनातील प्रत्येक परिस्थिती स्वीकारून समाधानी […]

Chanakya Niti | आचार्य चाणक्यांच्या मते घवघवीत यश हवं असेल तर या गोष्टींची काळजी घ्या
chankaya niti
Follow us on

मुंबईआचार्य चाणक्य (Acharya Chankaya) यांचे शब्द आणि विचार आजही खूप प्रभावी मानले जातात. जर आजही या गोष्टींचे पालन केले तर आपण सुखी आयुष्य जगू शकतो. आपल्या व्यस्त जीवनातील टिप्स धावपळीच्या जीवनात, चाणक्याच्या शब्दांकडे आपण दुर्लक्ष करतो. परंतु जर ते योग्यरित्या पाळले गेले तर यश आपलेच असते. आयुष्यात माणसाने जीवनातील प्रत्येक परिस्थिती स्वीकारून समाधानी राहावे. पण आचार्य चाणक्यांच्या (Chanakya)मते आयुष्यात काही गोष्टींच्या बाबतीत असंतोष (Unsatisfaction) राहणच महत्त्व असतं. आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य नीती (Chanakya Niti) या पुस्तकात काही विशेष परिस्थितींचा उल्लेख केला आहे. काही ठिकाणी कोणत्या गोष्टींचा अवलंब केल्यास माणूस आयुष्यात खूप पुढे जाऊ शकतो. याची माहिती दिली आहे. चाणक्यच्या प्रभावी कल्पना आणि धोरणांमुळे त्यांना जीवन प्रशिक्षक देखील म्हटले जाते. आज आम्ही त्यांच्या अशा काही गोष्टी सांगणार आहोत, जे त्यांच्यावर विश्वास ठेवतात त्यांना नक्कीच यश मिळते.

उत्पन्नानुसार खर्च
पैसा खर्च करण्याबाबत एक म्हण आहे, ‘चादराएवढे पाय पसरावेत’. हे जाणून घेतल्यावर अनेकदा असे दिसून आले आहे की जे आपल्या उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करतात त्यांना पैशाची कमतरता भासते. तर दुसरीकडे चाणक्य सांगतात की जे लोक आपल्या कमाईनुसार खर्च करतात, त्यांना नक्कीच यश मिळते. तुमच्या पैशाचे नियोजन करा.

तुमची गुपिते सांगू नका
चाणक्यच्या मते, जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची आर्थिक समस्या येत असेल किंवा तुम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक केली असेल तर ही गोष्ट सर्वांसोबत शेअर करू नये. त्यांच्या मते, तुमच्या खास गोष्टी कधीच कोणाला सांगू नका.

वेळ वाया घालवू नका
आचार्य चाणक्य यांच्या मते, ज्यांना वेळेचे महत्त्व कळत नाही, त्यांना अनेकदा अपयशाला सामोरे जावे लागते. चाणक्यांच्या मते एकदा गेलेली वेळ परत येत नाही. करिअर आणि स्थिर जीवनासाठी प्रत्येक क्षण मौल्यवान आहे. त्यामुळे तुमच्या वेळेचे महत्त्व ओळखा. ज्यांना वेळेचे खरे महत्त्व कळते ते यशाच्या पायऱ्या चढतच राहतात.

रागावर नियंत्रण ठेवा
आचार्य चाणक्य यांच्या मते क्रोध हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. ज्यांना रागावर नियंत्रण ठेवता येत नाही, त्यांना नुकसानीला सामोरे जावे लागते. इतकेच नाही तर अपयशही अशा लोकांना त्रास देते. वास्तविक, रागात बुडलेली व्यक्ती लोकांना आवडत नाही.तुमच्या रागावर तुम्हाला नियंत्रण ठेवता आले तर यश तुमचेच असेल.
रागावर नियंत्रण ठेवणे ही यशाच्या गुरुकिल्ली आहे.

(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

संबंधीत बातम्या :

Chanakya Niti : आयुष्यामध्ये यशाची शिखरे गाठायची असतील तर ‘या’ 5 लोकांपासून दोन हात लांबच राहा!

Rashifal : ‘या’ 3 राशींच्या लोकांच्या डोक्याचा ताप वाढण्याची शक्यता, खर्चावर लगाम ठेवा!

Vastu tips : नात्यामधील सततचे तणाव दूर करण्यासाठी बेडरूममध्ये ठेवा या गोष्टी आणि गोडवा वाढवा!