पूजा करताना ‘या’ गोष्टी चुकूनही जमिनीवर ठेवू नका; मानले जाते अशुभ, जाणून घ्या नियम

पूजा करताना काही नियमांचे विशेष पालन करणे आवश्यक मानले जाते. असे केल्याने पूजेचे पूर्ण फळ मिळते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. पूजेसाठी वापरल्या जाणाऱ्या काही वस्तू थेट जमिनीवर ठेवणे अशुभ मानले जाते. चला तर जाणून घेऊया, या वस्तू नेमक्या कोणत्या आहेत.

पूजा करताना या गोष्टी चुकूनही जमिनीवर ठेवू नका; मानले जाते अशुभ, जाणून घ्या नियम
Diya
| Edited By: | Updated on: Nov 13, 2026 | 1:57 PM

हिंदू धर्मात पूजेला विशेष महत्त्व आहे. पूजा करणे हा जीवनाचा अविभाज्य भाग मानला जातो. घरात दररोज पूजा केल्याने सुख-शांती टिकून राहते, देवी-देवतांचा आशीर्वाद मिळतो आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम व आपुलकी कायम राहते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. ज्या घरात नियमित पूजा-पाठ केला जात नाही, तिथे अशांतता आणि दुर्दैव येते, असेही मानले जाते. त्यामुळे अनेक जण दररोज आपल्या घरी देवांची पूजा करतात.

पूजा म्हणजे केवळ देवी-देवतांना फुले आणि फळे अर्पण करणे एवढेच नाही. पूजा करताना अनेक नियमांचे पालन करणेही महत्त्वाचे मानले जाते. पूजेशी संबंधित काही गोष्टी वर्ज्य मानल्या जातात. अनेकदा लोक नकळत काही चुका करतात. धार्मिक मान्यतेनुसार, पूजेतील काही पवित्र वस्तू थेट जमिनीवर ठेवणे अशुभ मानले जाते. चला तर जाणून घेऊया, कोणत्या वस्तू जमिनीवर ठेवू नयेत आणि त्यासंबंधी कोणते नियम पाळावेत.

Loading...

पूजेच्या कोणत्या वस्तू जमिनीवर ठेवू नयेत?

वास्तुशास्त्र आणि धार्मिक मान्यतांनुसार, पूजेशी संबंधित काही पवित्र वस्तू थेट जमिनीवर ठेवणे टाळावे. असे करणे या वस्तूंचा अनादर मानला जातो.

शिवलिंग आणि शाळिग्राम

शिवलिंग आणि शाळिग्राम यांना अत्यंत पवित्र मानले जाते. त्यांना देवाचे स्वरूप मानले जात असल्याने थेट जमिनीवर ठेवू नये. त्याऐवजी स्वच्छ वस्त्रावर किंवा चौरंगावर त्यांची स्थापना करावी.

देवी-देवतांच्या मूर्ती आणि फोटो

देवघराची साफसफाई करतानाही देवी-देवतांच्या मूर्ती किंवा फोटो थेट जमिनीवर ठेवू नयेत. ते ठेवण्यासाठी स्वच्छ आणि उंच जागेचा वापर करावा.

शंख

शंखाला देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे शंख थेट जमिनीवर ठेवणे अशुभ मानले जाते. तो नेहमी स्वच्छ जागी किंवा योग्य पात्रात ठेवावा.

दिवा

पूजा करताना किंवा दिवा लावल्यानंतर तो थेट जमिनीवर ठेवू नये. दिवा ठेवण्यासाठी छोटी प्लेट किंवा दिव्याच्या स्टँडचा वापर करावा.
धार्मिक पुस्तके आणि जपमाळ

भगवद्गीता, रामायण यांसारखे धार्मिक ग्रंथ आणि जपमाळ पवित्र मानली जाते. त्यामुळे ती कधीही जमिनीवर ठेवू नयेत. त्याऐवजी उंच जागी, स्टँडवर किंवा स्वच्छ वस्त्रावर ठेवावीत.

सोन्या-चांदीचे दागिने आणि मौल्यवान रत्ने

सोन्या-चांदीचे दागिने आणि मौल्यवान रत्नांना देवी लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. त्यामुळे या वस्तूही थेट जमिनीवर ठेवणे शुभ मानले जात नाही. त्या नेहमी सुरक्षित आणि स्वच्छ जागी ठेवाव्यात.

जानवे आणि पूजेचे साहित्य

जानवे, तुळशीची पानं, पूजेची फुलं, चंदन आणि पवित्र वस्त्रे या वस्तूही जमिनीवर ठेवणे टाळावे. त्या स्वच्छ ताटात, पात्रात किंवा वस्त्रावर ठेवाव्यात.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us