स्वार्थी लोक कसे ओळखायचे? आचार्य चाणक्य यांनी सांगितले 4 मार्ग, तिसरा अत्यंत सोपा

आचार्य चाणक्य यांन त्यांच्या नीतिशास्त्रामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्यामध्ये त्यांनी स्वार्थी लोक कसे ओळखायचे याबाबतच्या चार गोष्टी सांगितल्या आहेत.

| Updated on: Jan 12, 2026 | 7:15 PM
1 / 7
आचार्य चाणक्य यांना त्यांच्या काळातील सर्वात ज्ञानी, दूरदृष्टी असलेले आणि बुद्धिमान विचारवंत मानले जाते. जीवन, समाज, राजकारण आणि मानवी स्वभाव यावर त्यांनी दिलेले मार्गदर्शन आजही तितकेच उपयुक्त ठरते.

आचार्य चाणक्य यांना त्यांच्या काळातील सर्वात ज्ञानी, दूरदृष्टी असलेले आणि बुद्धिमान विचारवंत मानले जाते. जीवन, समाज, राजकारण आणि मानवी स्वभाव यावर त्यांनी दिलेले मार्गदर्शन आजही तितकेच उपयुक्त ठरते.

2 / 7

चाणक्य नीतिमध्ये त्यांनी केवळ यशस्वी जीवन कसे जगावे हेच सांगितले नाही तर कोणत्या लोकांपासून सावध राहावे हेही स्पष्टपणे सांगितले आहे. आज आम्ही देखील तुम्हाला स्वार्थी लोक कसे ओळखायचे याबद्दल सांगणार आहोत.

3 / 7

4 / 7

आचार्य चाणक्य सांगतात की, जो व्यक्ती तुमच्याशी केवळ त्याला काही काम असताना किंवा फायदा घ्यायचा असतानाच बोलतो अशा लोकांपासून तुम्ही लगेच अंतर ठेवण्यास सुरुवात करा. असे लोक कधीही प्रामाणिक नसतात. सुख-दुःखात ते कधीही तुमच्या पाठीशी उभे राहत नाहीत.

5 / 7

जर एखादी व्यक्ती तुमच्या समस्या, विचार किंवा भावना गांभीर्याने घेत नसेल आणि तुमचे बोलणे ऐकूनही दुर्लक्ष करत असेल तर समजून घ्या की ती व्यक्ती स्वार्थी आहे. त्यामुळे चाणक्य याच्या मते, जिथे सन्मान नाही तिथे नात्याची खरी किंमतही नसते.

6 / 7

चाणक्य यांच्या मते, मतलबी लोक गरज असताना गोड बोलतात, भरभरून कौतुक करतात. मात्र जेव्हा त्यांना तुमच्याकडून काही मिळत नाही तेव्हा तेच लोक टीका करायला आणि बदनामी करायला मागे-पुढे पाहत नाहीत. त्यामुळे परिस्थितीनुसार रंग बदलणाऱ्या व्यक्तीवर कधीही विश्वास ठेवू नका.

7 / 7

जर तुम्ही नेहमी इतरांच्या मदतीसाठी पुढे असता, पण जेव्हा तुम्हाला मदतीची गरज असते तेव्हा समोरची व्यक्ती कारणे सांगून टाळाटाळ करत असेल, तर हे नाते तोडले पाहिजे. चाणक्यांच्या मते अशा लोकांपासून दूर राहणेच शहाणपणाचे आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us