AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ लोकांचा अपमान करण्याची चूक करताय, व्हा सावध, आचार्य चाणाक्य म्हणतात…

आचार्य चाणाक्य यांनी त्यांच्या चाणाक्य नीतीमध्ये अनेक अशा गोष्टी सांगितल्या ज्या आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहे. पण चाणाक्य म्हणतात तुम्ही जर अशा लोकांचा अपमान करण्याची चूक करत असाल, तर सावध व्हा..

'या' लोकांचा अपमान करण्याची चूक करताय, व्हा सावध, आचार्य चाणाक्य म्हणतात...
| Updated on: May 07, 2026 | 2:17 PM
Share

आज स्पर्धेच्या युगात सर्वांनाच पुढे जायचं असतं. मेहनतीच्या जोरावर अनेक जण यशाचं शिखल गाठतात. पण काहींची वागणूक मात्र योग्य नसते. यशाच्या शिखरावर पोहोचलं तरी. व्यक्तीने सर्वांसोबत चांगलं बोलणं आणि वागणं अपेक्षित आहे. चाणक्य नीतीनुसार , आपल्या वागणुकीचा आपल्या भविष्यावर परिणाम होतो. चाणक्याच्या मते, जीवनात यश मिळवण्यासाठी केवळ कठोर परिश्रमच नव्हे, तर चांगली वागणूक देखील अत्यंत महत्त्वाची आहे. आपली वागणूक चांगली असेल तरच आपण यश मिळवू शकतो आणि समाजात चांगले जीवन जगू शकतो. त्याचप्रमाणे, आचार्य चाणक्यांनी असा इशारा दिला आहे की, अहंकार बाळगून आयुष्यात काही लोकांचा अपमान केल्यास जीवनात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. तर, जाणून घ्या जीवनात कोणत्या लोकांचा अपमान करू नये.

या लोकांचा अपमान करण्याची चूक कधीही करू नका:

गुरूंचा अपमान करू नका: गुरूंशिवाय ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. गुरुंना कायम महत्त्वाचं स्थान असतं म्हणून, गुरूंचा कधीच अनादर करू नये. गुरूंच्या आज्ञा न पाळल्याने, त्यांचा अपमान केल्याने जीवनात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात आणि लोकांची थट्टा केल्याने किंवा त्यांना तुच्छ लेखल्याने जीवनात प्रगती होऊ शकत नाही, असे आचार्य चाणक्य सांगतात.

आई-वडील : आपण आपल्या आई-वडिलांचा कधीही अपमान करू नये. आचार्य चाणक्यांच्या मते, आपल्या आई-वडिलांचा अपमान करणे आणि वृद्धापकाळात त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे हे पाप आहे. चाणक्य म्हणतात की, जर आपण आपल्या आई-वडिलांचे प्रेम आणि त्याग ओळखले नाहीत आणि त्यांना आदर दिला नाही, तर जीवनाला काही अर्थ उरत नाही.

सत्पुरुष : जे लोक धर्म आणि प्रामाणिकपणाच्या मार्गावर चालतात , त्यांचा आदर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. चाणक्य म्हणतात की, अशा सत्पुरुषांचा आदर केल्याने मनाला शांती मिळते आणि घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते.

ज्ञानी लोकांचा अपमान करू नये: चाणक्याच्या मते, अनुभवाचा खजिना आणि सखोल ज्ञान असलेल्या लोकांची संगत अनमोल असते. अशा व्यक्तींचा अपमान करणे हे बौद्धिक दारिद्र्याचे लक्षण आहे, ज्यामुळे माणूस उत्तम ज्ञान मिळवू शकत नाही

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा