Numerology : या मुलांकाच्या व्यक्तीने कुणाशीही करू नये हस्तांदोलन, नशीबाची लागलीच म्हणून समजा; तुमचा मुलांक तर नाही ना?.

Should Not Shake Hand : जर 3 मूलांक असलेल्या लोकांनी त्यांच्या उर्जेचे योग्य व्यवस्थापन केले तर ते आयुष्यात कधीही मागे हटणार नाहीत. त्यांना फक्त त्यांची ऊर्जा कुठे द्यायची आणि कुठे द्यायची नाही याची काळजी घ्यावी लागते.

Numerology : या मुलांकाच्या व्यक्तीने कुणाशीही करू नये हस्तांदोलन, नशीबाची लागलीच म्हणून समजा; तुमचा मुलांक तर नाही ना?.
| Updated on: Jun 18, 2025 | 3:10 PM

Numerology : अंकशास्त्रात, प्रत्येक संख्येची एक विशेष ओळख असते. तो अंक केवळ आपला स्वभावच ठरवत नाही तर आपल्या उर्जेवर, विचारांवर आणि नशिबावरही परिणाम करतो. कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक अर्था मूळ क्रमांक 3 असतो. अशा लोकांचा संबंध देवगुरू बृहस्पतीशी असतो, ज्यांना ज्ञान, विचार आणि आत्मविश्वासाचे प्रतीक मानले जाते. याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया.

3 मूलांक असलेले लोक जन्मतःच तीक्ष्ण मनाचे, आत्मविश्वासू आणि बुद्धिमान असतात. त्यांच्यात नेतृत्व क्षमता असते आणि ते इतरांसाठी मार्गदर्शक बनतात. हे लोक धर्म, शिक्षण आणि सल्ला देण्याच्या क्षेत्रात खूप चांगले काम करू शकतात. त्यांच्याकडे गहन विचारसरणी आणि प्रबळ इच्छाशक्ती असते. पण या लोकांसाठी एक गोष्ट थोडी वेगळी आणि खास आहे – त्यांनी विचार न करता इतरांशी हस्तांदोलन करू नये.

हस्तांदोलन का करू नये ?

अंकशास्त्रानुसार, 3 मूलांक असलेल्या लोकांची ऊर्जा खूप प्रबळ असते. जेव्हा ते एखाद्याशी हस्तांदोलन करतात तेव्हा त्यांची सकारात्मक ऊर्जा समोरच्या व्यक्तीकडे जाते. यामुळे त्यांचा तर फायदा होता, पण 3 मूलांक असलेले लोक मात्र हळू-हळू त्यांची उर्जा गमावू लागतात. याचा त्यांच्या आत्मविश्वासावर आणि नशिबावरही परिणाम होऊ शकतो.

ठरू शकते नुकसानकारक

साधारणपणे, हस्तांदोलन करणे हा एक सभ्य मार्ग मानला जातो, परंतु 3 मूलांक असलेल्या लोकांसाठी ही सवय हानिकारक असू शकते. बऱ्याचदा असे घडते की आयुष्यात अचानक स्तब्धता येते, कठोर परिश्रमाचे फळ मिळत नाही किंवा आत्मविश्वास कमकुवत होऊ लागतो – या सर्वामागे ऊर्जेचे हस्तांतरण हे एक मोठे कारण असू शकते.

ओरा कसा वाचवायचा?

3 मूलांक असलेल्या लोकांचा ओरा अर्थात आभा,म्हणजेच ऊर्जा क्षेत्र खूप मजबूत असते. ही आभा त्यांना इतरांपेक्षा वेगळे बनवते. या आभाचे रक्षण करणे महत्वाचे आहे. यासाठी, जेव्हाही तुम्ही एखाद्याला भेटता तेव्हा हस्तांदोलन करण्याऐवजी हात जोडून नमस्कार करा. जर कोणत्याही परिस्थितीत हस्तांदोलन करणे आवश्यक असेल तर मनात ‘ॐ’ म्हणून किंवा तुमच्या आवडत्या व्यक्तीचे नाव घेऊन हस्तांदोलन करा. यामुळे तुमची ऊर्जा सुरक्षित राहते.

काळजी घ्या

थोडा आत्मसंयम आणि सावधगिरी हे 3 मूलांक असलेल्यांसाठी ढाल म्हणून काम करते. जर तुम्हीही 3 मूलांकाशी निगडीत असाल, तर पुढच्या वेळी कोणाशी हस्तांदोलन करण्यापूर्वी थोडी वाट पहा – कदाचित हे पाऊल तुमच्या नशिबाची दिशा बदलेल.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)