Akshay Tritiya 2023 : अक्षय तृतीयेला या वस्तूंचे दान केल्याने प्रसन्न होते माता लक्ष्मी, कधीच भासत नाही पैशांची चणचण

अक्षय तृतीयेला सोने खरेदी करण्याचाही कायदा आहे. असे मानले जाते की या दिवशी सोने खरेदी केल्याने जीवनात खूप प्रगती होते. मात्र, प्रत्येकाला सोने खरेदी करणे शक्य होत नाही. अशा स्थितीत इतरही अनेक उपाय आहेत, जे केल्याने शुभ परिणाम प्राप्त होतात.

Akshay Tritiya 2023 : अक्षय तृतीयेला या वस्तूंचे दान केल्याने प्रसन्न होते माता लक्ष्मी, कधीच भासत नाही पैशांची चणचण
अक्षय तृतीया
Image Credit source: Akshay trituya
| Updated on: Apr 21, 2023 | 6:35 PM

मुंबई : हिंदू धर्मात अक्षय तृतीयेचा (Akshay Tritiya 2023) दिवस अतिशय शुभ मानला जातो. या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची विशेष पूजा केली जाते. असे केल्याने साधकाच्या मनोकामना पूर्ण होतात, तसेच घरात सुख-समृद्धी नांदते. अक्षय तृतीयेला सोने खरेदी करण्याचाही कायदा आहे. असे मानले जाते की या दिवशी सोने खरेदी केल्याने जीवनात खूप प्रगती होते. मात्र, प्रत्येकाला सोने खरेदी करणे शक्य होत नाही. अशा स्थितीत इतरही अनेक उपाय आहेत, जे केल्याने शुभ परिणाम प्राप्त होतात. अक्षय तृतीयेच्या दिवशी गरजू व्यक्तीला दान करणे खूप फायदेशीर ठरते, असे मानले जाते. चला जाणून घेऊया अक्षय तृतीयेला कोणत्या वस्तू दान कराव्यात.

अक्षय तृतीयेला करा या वस्तूंचे दान

  1. अक्षय तृतीयेला कुमकुम दान करणे खूप शुभ मानले जाते. जे विवाहित जीवन जगत आहेत त्यांनी विशेषत: दान करावे. असे मानले जाते की यामुळे तुमची आणि तुमच्या जोडीदाराची जवळीक वाढते आणि नाते मजबूत होते.
  2. अक्षय तृतीयेच्या दिवशी भुकेल्या किंवा गरीब व्यक्तीला धान्य दान करा. असे मानले जाते की दान करणे हे एक अतिशय पुण्यपूर्ण कार्य आहे, ज्यामुळे जीवनात आनंद आणि समृद्धी येते.
  3. हिंदू धर्मात पूजा करताना सुपारीचा वापर केला जातो. अक्षय तृतीयेच्या दिवशी सुपारी दान केल्याने सुख आणि सौभाग्य लाभते असे मानले जाते. असे केल्याने तुम्हाला आर्थिक लाभ होतो आणि आयुष्यातील त्रासही दूर होतात.
  4. नारळ दान केल्याने मनुष्य मोक्ष प्राप्त करतो असे मानले जाते. अक्षय तृतीयेच्या दिवशी हे दान केल्यास त्याचे अधिक लाभ होतात. असे केल्याने भगवान विष्णूची विशेष कृपा राहते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)