Budh Gochar : बुध ग्रह 7 मे रोजी मेष राशीत करणार प्रवेश, या 3 राशींना होणार फायदा

Mercury transit May 2025 Lucky For 3 Zodiacs : बुध ग्रहाच्या गोचरमुळे मे महिन्यात 3राशीच्या लोकांच्या जीवनात बदल होणार आहेत. या 3 राशींना काय काय फायदा होऊ शकतो? जाणून घ्या.

Budh Gochar : बुध ग्रह 7 मे रोजी मेष राशीत करणार प्रवेश, या 3 राशींना होणार फायदा
Mercury transit May 2025
Image Credit source: Tv9 Bharatvarsh
| Updated on: May 04, 2025 | 6:36 PM

अनेक ग्रह ठराविक काळानंतर विविध राशींमध्ये गोचर करत असतात. त्या ग्रहांच्या गोचर करण्याचा चांगला वाईट परिणाम हा संबंधित राशींवर होत असतो. आता येत्या काही दिवसांमध्ये बुध ग्रह राशी बदलणार आहे. बुध सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह आहे. त्यामुळेच बुधाला ग्रहांचा राजकुमारही म्हटलं जातं. बुध ग्रहाला बुद्धी, सौंदर्य, ऐश्वर्य, प्रतिष्ठा आणि धनाचं प्रतिम म्हटलं जातं. माहितीनुसार, बुध 7 मे रोजी मेष राशीत प्रवेश करणार आहे. बुध 23 मे पर्यंत या मेष राशीत असणार आहे. त्यामुळे हा 16 दिवसांचा कालावधी 3 राशींसाठी गेमचेंजर ठरणार आहे. बुध ग्रहाच्या मेष गोचरमुळे 3 राशींचे दिवस पालटणार आहेत. या 3 राशींच्या लोकांची समाजात प्रतिष्ठा वाढेल. त्या 3 राशी कोणत्या आहेत? जाणून घेऊयात.

बुध ग्रहाच्या गोचरमुळे कुंभ, तूळ आणि कर्क या 3 राशींना फायदा होणार आहे. या 3 राशींसाठी बुध गोचरमुळे काय काय संभाव्य फायदा होणार? हे जाणून घेऊयात.

तुळ राशी

बुध गोचरमुळे तूळ राशीच्या लोकांचे 7 मे पासून अच्छे दिन सुरु होणार आहेत. बुध गोचरमुळे तुम्ही नोकरी सोडून स्वत:चा व्यवसाय सुरु करु शकता, असं केल्यास तुम्ही यशस्वी व्हाल. गुंतवणुकीसाठी चांगला काळ आहे. कोणत्याही योजनेत गुंतवणूक केल्यास अपेक्षित फायदा मिळण्याचे संकेत आहे. उत्पन्नाचे मार्ग वाढतील, ज्यामुळे आर्थिक स्थिती सुधारेल.

कुंभ राशी

बुध गोचरमुळे कुंभ राशीचे दिवस पालटणार आहे. कुंभ राशीच्या लोकांचं नशीब फळफळणार आहे. करियरमध्ये यशस्वी होण्यासाठी ही वेळ शुभ ठरु शकते. तुमच्या मेहनतीचं तुम्हाला या काळात फळ मिळू शकतं. नोकरदार वर्गाला पगारवाढ मिळण्यासह प्रमोशन मिळण्याचे संकेत आहेत. उच्च शिक्षणासाठी विदेशात जाण्याची संधी आहे.

कर्क राशी

बुध ग्रहाच्या राशी परिवर्तनामुळे कर्क राशी असलेल्या लोकांच्या आयुष्यात बदल होण्याची चिन्हं आहेत. घरातील अनेक समस्यांपासून सुटका होईल. जोडीदारासोबतचे संबंध आणखी दृढ होतील. कुटुंबियांसह 2-3 दिवस बाहेर जाऊ शकता. रखडलेली काम निकाली निघतील. व्यवसायिकांना फायदा होईल. नवी गाडी खरेदी करण्याचा विचार करु शकता.

(Disclaimer: वरील माहिती ही सामान्य मान्यतेवर आधारित आहे. टीव्ही9 मराठी याची पुष्ठी करत नाही.)