Ketu transit 2025 : दीड वर्षानंतर पापग्रह केतु करणार राशीबदल, सिंह राशीत येताच 3 राशींचं करणार भलं
Ketu Gochar Lucky For 3 Zodiacs : केतु येत्या काही दिवसांमध्ये 18 मे रोजी सिंह राशीत प्रवेश करणार आहेत. केतु गोचर एकूण 3 राशींसाठी फायदेशीर ठरणार आहे. त्या 3 राशी कोणत्या आहेत? जाणून घेऊयात.

राहु आणि केतूला छाया ग्रह असं म्हटलं जातं. राहु आणि केतूला ग्रहाचा दर्जा नाही. मात्र त्यांची प्रकृती ग्रहाप्रमाणे असल्याचं म्हटलं जातं. राहु आणि केतु इतर ग्रहाप्रमाणे नियमित आणि ठराविक काळाने गोचर करतात. राहु आणि केतू दीड वर्षानंतर राशी बदल करत आहेत. या वर्षी राहु आणि केतू राशी बदल करत आहेत. केतु ग्रह 18 मे रोजी सिंह राशीत प्रवेश करणार आहे. केतु तब्बल 18 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर या राशीत परतणार आहे. केतुच्या या प्रवेशामुळे 3 राशीच्या लोकांचे दिवस बदलणार आहेत. या राशीच्या लोकांचं नशीब फळफळणार आहे. या 3 राशीच्या लोकांचे 18 मे पासून अच्छे दिन सुरु होणार आहेत. या राशीच्या लोकांना येत्या काही दिवसांमध्ये अनेक चांगल्या बातम्या मिळतील, ज्याचा त्यांनी कधीच विचार केला नसेल. त्या 3 राशी कोणत्या? जाणून घेऊयात.
केतुच्या सिंह राशीचा 3 राशींना फायदा
केतुच्या सिंह राशीतील प्रवेशामुळे धनु, वृश्चिक आणि वृषभ राशीवर सकारात्मक परिणाम होणार आहे. कोणत्या राशीला कसा फायदा होईल? हे सविस्तर जाणून घेऊयात.
धनु राशी
केतुचं दीड वर्षांनंतर होणारं गोचर धनु राशीसाठी फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे धनु राशीच्या लोकांच्या आयुष्यातील कष्ट काही प्रमाणात कमी होतील. उद्योगात भरभराट होईल, ज्यामुळे अधिक धनलाभ होईल. नोकरदार वर्गाला पगारवाढीची भेट मिळू शकते. कामात प्रमोशन तसेच मोठी जबाबदारी मिळू शकते.
वृषभ राशी
केतु गोचर वृषभ राशीसाठी भरभराटीचं आणि लाभदायक ठरणार आहे. वृषभ राशीच्या लोकांची रखडलेली कामं पूर्ण होतील. भूतकाळात केलेल्या गुतंवणुकीतून चांगला परतावा मिळण्याचे संकेत आहे. नवीन गाडी घेऊ शकता. कुटुंबियांसह बाहेर फिरायला जाण्याची संधी मिळू शकते.
वृश्चिक राशी
वृश्चिक राशीला केतु गोचरमुळे अनेक फायदे होऊ शकतात. नोकरीच्या शोधात असलेल्यांना अपेक्षित जॉब मिळू शकतो. कामात नवीन संधीच्या प्रतिक्षेत असणाऱ्यांना चांगल्या पगार मिळू शकतो.
(Disclaimer: वरील माहिती ही सामान्य मान्यतेवर आधारित आहे. टीव्ही9 मराठी याची पुष्ठी करत नाही.)
