Smriti Mandhana : स्मृतीला सहकारी खेळाडूकडूनच अशी भीती! आयसीसीच्या निर्णयामुळे धाकधूक
Shafali Verma and Smriti Mandhana Womens T20I rankings: शफाली वर्मा हीला श्रीलंकेविरुद्धच्या टी 20i मालिकेत सलग 3 अर्धशतक झळकावल्याचा जबरदस्त फायदा झाला आहे. शफालीने टी 20i रँकिंगमध्ये मोठी झेप घेतली आहे.

वूमन्स टीम इंडिया सध्या मायदेशात श्रीलंकेविरुद्ध 5 सामन्यांची टी 20i मालिका खेळत आहे. टीम इंडिया या मालिकेत 4-0 ने आघाडीवर आहे. तर उभयसंघातील पाचवा आणि अंतिम टी 20i सामना हा मंगळवारी 30 डिसेंबरला खेळवण्यात येणार आहे. त्याआधी आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने वूमन्स रँकिंग जाहीर केली आहे. ताज्या आकडेवारीनुसार, या रँकिंगमध्ये टीम इंडियाची ओपनर आणि उपकर्णधार स्मृती मंधाना टॉप 3 मध्ये कायम आहे. मात्र स्मृतीच्या या टॉप 3 मधील स्थानावर सहकारी खेळाडूमुळेच टांगती तलवार आहे.
टीम इंडियाची ओपनर लेडी सेहवाग अर्थात शफाली वर्मा हीने श्रीलंकेविरुद्धच्या टी 20i मालिकेत कमाल कामगिरी केली आहे. शफालीने सलग 3 सामन्यात अर्धशतक झळकावलं. शफालीला तिच्या या कामगिरीचा फायदा झाला. शफालीने यासह टी 20i रँकिंगमध्ये थेट चौथ्या स्थानी झेप घेतली आहे. शफालीच्या या मोठ्या उडीमुळे स्मृतीचं स्थान धोक्यात आलं आहे. शफाली स्मृतीला मागे टाकू शकते.
शफालीची धमाकेदार कामगिरी
शफालीने श्रीलंकेविरुद्धच्या या टी 20i मालिकेत आतापर्यंत जबरदस्त बॅटिंग केलीय. शफालीने पहिल्या सामन्यात 9 धावा केल्या. मात्र शफालीने त्यानंतर जोरदार कमबॅक केलं आणि सलग 3 सामन्यात अर्धशतक झळकावले. स्मृतीने या मालिकेतील 4 टी 20i सामन्यांत 185.82 च्या स्ट्राईक रेटने आणि 118 च्या सरासरीने एकूण 236 धावा केल्या आहेत. शफालीने या खेळीत 36 चौकार आणि 5 षटकार लगावले आहेत.
शफालीमुळे स्मृतीला मागे पडण्याची भीती?
शफाली या रँकिंगआधी दहाव्या स्थानी होती. मात्र आता शफाली थेट 4 स्थानांची झेप घेत सहाव्या क्रमांकावर पोहचली आहे. शफालीच्या खात्यात 736 रेटिंग पॉइंट्स आहेत. तर स्मृती मंधाना 767 रेटिंग पॉइंट्सह तिसऱ्या स्थानी आहे. दोघींमध्ये फक्त 31 पॉइंट्सचा फरक आहे.
टॉप 10 मध्ये किती भारतीय?
आयसीसीच्या वूमन्स टी 20i बॅटिंग रँकिंगमध्ये टीम इंडियाच्या 3 फलंदाजांचा समावेश आहे. यात शफाली वर्मा, स्मृती मंधाना व्यतिरिक्त जेमिमाह रॉड्रिग्स हीचा समावेश आहे. जेमीमाहची नवव्या स्थानावरुन दहाव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. जेमीमाच्या खात्यात 615 रेटिंग पॉइंट्स आहेत. तर कॅप्टन हरमनप्रीत कौर 15 व्या स्थानी कायम आहे.
बॅटिंग रँकिंगमध्ये नंबर 1 कोण?
दरम्यान टी 20i बॅट्समन रँकिंगमध्ये ऑस्ट्रेलियाची बेथ मुनी पहिल्या स्थानी विराजमान आहे. मुनीच्या खात्यात 794 रेटिंग पॉइंट्स आहेत. तर विंडीजची हॅली मॅथ्यूज दुसऱ्या क्रमांकावर आहे.
