AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ENG vs NZ : न्यूझीलंडकडून 160 रन्सचं टार्गेट, सेमी फायनलसाठी इंग्लंडला किती धावांवर रोखावं लागणार?

England vs New Zealand Super 8 : न्यूझीलंडला आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील सेमी फायनलमध्ये पोहचायचं असेल तर त्यांना सुपर 8 फेरीत एकूण दुसरा सामना जिंकावा लागणार आहे.

ENG vs NZ : न्यूझीलंडकडून 160 रन्सचं टार्गेट, सेमी फायनलसाठी इंग्लंडला किती धावांवर रोखावं लागणार?
Tim Seifert England vs New ZealandImage Credit source: @BLACKCAPS and @englandcricket X Account
| Updated on: Feb 27, 2026 | 9:30 PM
Share

आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील सुपर 8 फेरीत 27 फेब्रुवारीच्या सामन्यात इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड आमनेसामने आहेत. दोन्ही संघांचा हा सुपर 8 फेरीतील तिसरा आणि अंतिम सामना आहे. इंग्लंडने या फेरीतील पहिले आणि सलग 2 सामने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. तर न्यूझीलंडचा पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. तर न्यूझीलंडने दुसऱ्या सामन्यात विजय मिळवला. आता दोन्ही संघ कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये आमनेसामने आहेत. न्यूझीलंडला उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी हा सामना जिंकणं महत्त्वाचं आहे. न्यूझीलंडने या सामन्यात इंग्लंडसमोर 160 धावांचं आव्हान ठेवलं आहे. अशात आता न्यूझीलंडला सेमी फायनलमध्ये पोहचण्यासाठी इंग्लंडला किती धावांवर रोखावं लागणार? हे जाणून घेऊयात.

न्यूझीलंडला फक्त विजय हवा

न्यूझीलंडला सेमी फायनलमध्ये पोहचण्यासाठी इंग्लंड विरुद्ध फक्त विजय मिळवणं महत्त्वाचं आहे. न्यूझीलंडसाठी इंग्लंडला अमूक धावांवर रोखण्याची कोणतीही अट नाही. न्यूझीलंडचा सुपर 8 फेरीतील पाकिस्तान विरुद्धचा सामना हा पावसामुळे रद्द झाला. तर न्यूझीलंडने दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेवर मात केली. त्यामुळे न्यूझीलंडच्या खात्यात 3 गुण आहेत. न्यूझीलंडने आता इंग्लंडला पराभूत केलं तर त्यांचे एकूण 5 गुण होतील. मात्र इंग्लंडने हे आव्हान कमीत कमी चेंडूत पूर्ण केलं तर न्यूझीलंडच्या अडचणीत वाढ होऊ शकते.

न्यूझीलंडचा मोठ्या फरकाने पराभव झाल्यास पाकिस्तानची सेमी फायनलमध्ये पोहचण्याची आशा कायम राहिल. मात्र न्यूझीलंडने हा सामना कमी फरकाने गमावला तरी ते उपांत्य फेरीत पोहचतील. त्याचं कारण म्हणजे न्यूझीलंडचा पाकिस्तानपेक्षा चांगला असलेला नेट रनरेट. न्यूझीलंडने हा सामना कमी फरकाने गमावला आणि पाकिस्तानने त्यांचा शेवटचा सुपर 8 चा सामना जिंकला तरीही किवींना काहीही फरक पडणार नाही.  त्याचं कारण म्हणजे नेट रनरेट.  त्यामुळे आता इंग्लंड-न्यूझीलंड सामन्याच्या निकालाकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष लागून राहिलं आहे.

न्यूझीलंडचा डाव

कर्णधार मिचेल सँटनर याने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 159 धावा केल्या. न्यूझीलंडसाठी ग्लेन फिलिप्स याने सर्वाधिक 39 धावा केल्या. ओपनर टीम सायफर्ट याने 39 तर फिन एलेन याने 29 धावांचं योगदान दिलं. त्या व्यतिरिक्त एकालाही 20 पार पोहचता आलं नाही. इंग्लंडसाठी आदिल रशीद, विल जॅक्स आणि रेहान अहमद या तिघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या.

Follow Us
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...