AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ENG vs NZ Super 8 : न्यूझीलंडचा निर्णायक सामन्यात बॅटिंगचा निर्णय, इंग्लंड विरुद्ध प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोण?

England vs New Zealand Super 8 Toss : न्यूझीलंडने इंग्लंड विरूद्धच्या निर्णायक आणि अटीतटीच्या सामन्यात प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही.

ENG vs NZ Super 8 : न्यूझीलंडचा निर्णायक सामन्यात बॅटिंगचा निर्णय, इंग्लंड विरुद्ध प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोण?
Harry Brook and Mitchell Santner ENG vs NZ Super 8Image Credit source: Social Media
| Updated on: Feb 27, 2026 | 7:28 PM
Share

आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत 27 फेब्रुवारीला सुपर 8 फेरीत इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड आमनेसामने आहेत. दोन्ही संघांचा हा सुपर 8 मधील तिसरा आणि शेवटचा सामना आहे. इंग्लंडने सुपर 8 मधील पहिले दोन्ही सामने जिंकले आहेत. तर न्यूझीलंडचा 1 सामना पावसामुळे वाया गेला. तर न्यूझीलंडने दुसऱ्या सामन्यात विजय मिळवला. इंग्लंडने सलग 2 विजयांसह उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. त्यामुळे इंग्लंडसाठी हा सामना औपचारिकता आहे. मात्र इंग्लंडचा हा सामना जिंकून विजयी हॅट्रिक करण्याचा प्रयत्न असणार आहे. तसेच इंग्लंडला हा सामना जिंकून ए ग्रुपमधून टेबल टॉपर राहण्याची संधी आहे.

तर दुसऱ्या बाजूला न्यूझीलंडला स्वत:च्या जोरावर सेमी फायनलमध्ये पोहचण्यासाठी हा सामना जिंकणं बंधनकारक आहे. त्यामुळे या सामन्यात न्यूझीलंड विजय मिळवून सेमी फायनलचं तिकीट मिळवते की इंग्लंड विजयी हॅट्रिक करण्यात यशस्वी ठरते? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

न्यूझीलंडने टॉस जिंकला

इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड सामन्याचं आयोजन हे कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनर याने बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. न्यूझीलंडने या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही.  न्यूझीलंड या सामन्यात श्रीलंकेविरुद्धच्या प्लेइंग ईलेव्हनसह मैदानात उतरली आहे. न्यूझीलंडच्या याच 11 खेळाडूंनी श्रीलंकेवर सुपर 8 फेरीतील सामन्यात 61 धावांनी विजय मिळवला होता.

पाकिस्तानचं सामन्याकडे लक्ष

दरम्यान या सामन्याकडे पाकिस्तानचं लक्ष लागून आहे. पाकिस्तानला सेमी फायनलमध्ये पोहचण्याची संधी आहे. मात्र पाकिस्तानचं समीकरण हे सर्व जर तर वर आधारलेलं आहे. इंग्लंडने न्यूझीलंडवर मोठ्या फरकाने विजय मिळवला तरच पाकिस्तानच्या उपांत्य फेरीतील आशा कायम असतील. त्यामुळे हा सामना कोण जिंकतं याकडे पाकिस्तानची करडी नजर असणार आहे.

इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : फिलिप साल्ट, जोस बटलर (विकेटकीपर), हॅरी ब्रूक (कर्णधार), जेकब बेथेल, टॉम बँटन, सॅम करन, विल जॅक्स, लियाम डॉसन, रेहान अहमद, जोफ्रा आर्चर आणि आदिल रशीद.

न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन : टीम सायफर्ट (विकेटकीपर), फिन ऍलन, रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, डॅरेल मिचेल, मार्क चॅपमन, मिचेल सँटनर (कॅप्टन), कोल मॅककोंची, मॅट हेन्री, ईश सोढी आणि लॉकी फर्ग्युसन.

Follow Us
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...