
पौर्णिमा हा हिंदू धर्मातील एक शुभ दिवस मानला जातो (Chaitra Purnima 2022). या दिवशी लोक दिवसभर उपवास पाळतात आणि चंद्र पाहिल्यानंतर उपवास सोडतात. याशिवाय, भगवान विष्णूप्रती श्रद्धा व्यक्त करण्यासाठी भाविक सत्यनारायण पूजा करतात. हिंदू धर्मात पौर्णिमा हा प्रत्येक महिन्याचा शेवटचा दिवस असतो.

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेची आज चैत्र नवरात्र निमित्त विशेष पूजा करण्यात आली यावेळी तुळजाभवानी मातेचा गाभरा आकर्षक फुलांनी साजविण्यात आला होता.

मंदिर परिसरात सुद्धा फुलांची सजावट करण्यात आली. उद्या पासून तुळजाभवानी मातेची चैत्र पौर्णिमा उत्सव साजरा होणार आहे. चैत्र महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला चैती पूनम असेही म्हणतात. या दिवशी भगवान श्री हरिची उपासना आणि उपवास करण्याचा नियम आहे.

पौर्णिमेच्या सुमारास चंद्र चित्रा नक्षत्रात असल्यामुळे चैत्र हे नाव बहुधा वैदिककालाच्या अखेरीस पडले. तत्पूर्वी याला मधुमास म्हणत. सूर्य मीन राशीत असताना चैत्रास सुरुवात होते. प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या तारखेला पौर्णिमा येते

पौर्णिमेचा दिवस देवी लक्ष्मीला समर्पित आहे. या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा विधीपूर्वक व व्रत इत्यादी केल्याने देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते.