
हिंदू धर्मातील वास्तुशास्त्रानुसार, रात्रीच्या वेळी काही कामे करू नयेत असं म्हटलं जातं. आणि जर आपण काही गोष्टी केल्या तर आपल्याला वाईट परिणाम भोगावे लागतील असं म्हटलं जातं. या टिप्स जाणून घेतल्यानंतर, रात्री अशा गोष्टी टाळणे चांगले मानले जाते. जर आपण रात्रीच्या वेळी यापैकी कोणतीही गोष्ट केली तर आपल्या जीवनात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.
वास्तुशास्त्रानुसार, आपल्या घराची रचना, दिशा, वातावरण आणि आपण करत असलेले सर्व काम शुभ असले पाहिजे. या शास्त्राद्वारे आपण त्रास टाळू शकतो. वास्तुशास्त्रात विशेषतः अशा कामांचा उल्लेख आहे जे रात्री करू नयेत. रात्री केलेली कामे अशुभ मानली जातात. या गोष्टी आपल्यासाठी वाईट परिणाम करतात असं म्हटलं जातं.जाणून घेऊयात ती कोणती कामे आहेत जी रात्री करणे टाळली पाहिजेत.
रात्री उशिरा जेवण करू नका.
रात्री उशिरा जेवणे चांगले नाही. वास्तुशास्त्रानुसार रात्री 8 नंतर जेवणे शरीरासाठी हानिकारक मानले जाते. त्यामुळे आपली ऊर्जा नष्ट होते. याशिवाय रात्री उशिरा जेवल्याने अन्न व्यवस्थित पचत नाही. आरोग्याच्या समस्यांमुळे आपल्याला चांगले परिणाम मिळू शकत नाहीत. त्यामुळे रात्री जेवणाबाब काळजी घेतली पाहिजे.
या दिशेने डोके ठेवून झोपू नये
वास्तुशास्त्रानुसार, रात्री झोपताना उत्तर दिशेला डोके ठेवू नये. त्याचे प्रतिकूल परिणाम होतात. उत्तर दिशा ही देवांचे निवासस्थान नसल्यामुळे, या दिशेला डोके ठेवून झोपल्याने मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारे नकारात्मक परिणाम होतात. या दिशेला डोके ठेवून झोपल्याने व्यक्तीची ऊर्जा कमी होते.
रात्री नखे कापणे
वास्तुशास्त्रानुसार, रात्रीच्या वेळी नखे कापणे ही खूप वाईट गोष्ट आहे. त्यामुळे गरिबी वाढते. रात्रीच्या वेळी नखे कापणारे लोक देवी लक्ष्मीची कृपा गमावतात. मग त्यांना मानसिक आणि आर्थिक दोन्ही अडचणींना तोंड द्यावे लागते. म्हणून, रात्रीच्या वेळी नखे कापणे ही चांगली कल्पना नाही.
सूर्यास्तानंतर झाडू मारणे
वास्तुशास्त्रात सूर्यास्तानंतर घर झाडणे अशुभ मानले जाते. झाडूमध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो असे मानले जाते. यामुळे धनहानी होते. घराची स्वच्छता सूर्यास्ताआधी करावी.
या वास्तु टिप्सचे पालन केल्याने आपले जीवन मंगलमय होईल. वास्तुशास्त्रात नमूद केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे आणि रात्री अनावश्यक काम न करणे महत्वाचे आहे. या टिप्समुळे आपल्या कुटुंबात शांती आणि आनंद येईल. तुमच्या आरोग्यावर आणि आर्थिक परिस्थितीवर नकारात्मक परिणाम टाळण्यासाठी या वास्तु टिप्सचे पालन करण्याचा प्रयत्न करा.
( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)