Baba Vanga Prediction: अडचणीच्या अल निनोवर मात; सुखाच्या सरी कोसळणार, या राशी होणार मालामाल, बाबा वेंगाचं भाकीत काय?

Baba Vanga Weekly Rashifal Prediction 2026: जून महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यासाठी बाबा वेंगाच्या भविष्यवाणीची जोरदार चर्चा होत आहे. 15 ते 21 जून या काळात मेष, धनूसह या 5 राशींसाठी अत्यंत खास राहणार आहे.

Baba Vanga Prediction: अडचणीच्या अल निनोवर मात; सुखाच्या सरी कोसळणार, या राशी होणार मालामाल, बाबा वेंगाचं भाकीत काय?
बाबा वेंगाचं भाकीत काय?
Image Credit source: एजन्सी
| Updated on: Jun 13, 2026 | 3:31 PM

Baba Vanga Prediction Weekly Lucky Rashifal 2026: जून महिन्याचा तिसरा आठवडा या पाच राशींसाठी अत्यंत महत्त्वाचा राहणार आहे. त्यांच्या आयुष्यातील अल निनो सारख्या अडचणी दूर होतील आणि सुखाच्या सरी बरसतील. त्यांच्या आयुष्यात सुख-समृद्धी येईल. 15 ते 21 जूनपर्यंत मेष, वृश्चिक, धनुसह या 5 राशींना अच्छे दिन असतील. बाबा वेंगाने त्यांचे करिअर, आर्थिक परिस्थिती, कौटुंबिक जीवन आणि व्यक्तिगत विकासाबाबत सकारात्मक परिणामांवर भाष्य केले आहे.

मेष राशीसाठी कसा असेल आठवडा?

Baba Vanga नुसार मेष राशीसाठी 8 ते 14 जूनपर्यंत अनेक नवीन संधी आयुष्यात येतील. नोकरदार वर्गासाठी चांगला आठवडा असेल. वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळेल. व्यवसायात नवीन संधी मिळेल. नवीन प्रस्ताव येतील. घर अथवा सदनिका खरेदी करायची असेल तर हा आठवडा त्यासाठी चांगला आहे. कुटुंबात सुख, शांती असेल. अनेक दिवसांपासून मनात असलेली सुप्त इच्छा पूर्ण होण्यासाठी चांगला काळ आहे. एखादा शुभ संकेत मिळू शकतो.

कन्या राशीला सुखाचे दिवस

कन्या राशीसाठी जून महिन्यातील तिसरा आठवडा हा भाग्यकारक असेल. त्यांचा भाग्याची साथ मिळणार आहे. त्यांच्या कष्टाला आता फळ मिळणार आहे. नवीन विवाहित जोडप्यासाठी कुटुंबातून आनंदवार्ता मिळू शकते. विद्यार्थ्यांसाठी हा कालावधी अनुकूल आहे. धनलाभाच्या नवीन संधी चालून येतील. गुंतवणुकीतून आता लाभ मिळाल्याचे दिसून येईल. कायदेशीर अडचणीत अडकलेला असेल तर त्यातून मोठा दिलासा मिळेल.

वृश्चिक राशीच्या व्यक्तींचा वाढेल आत्मविश्वास

बाबा वेंगानुसार, वृश्चिक राशीच्या लोकांसाठी तिसरा आठवडा हा नवीन ऊर्जा घेऊन येईल. आत्मविश्वासाने तुम्ही भरून जाल. करिअरमध्ये मोठी संधी मिळेल. उत्पन्नात मोठी वाढ होईल. या राशीच्या लोकांना परदेशी व्यापार, नोकरी, शिक्षणात मोठी संधी आणि धनलाभाचे योग दिसत आहेत. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी अनुकूल कालावधी आहे. नात्यात मधुरता वाढेल. आरोग्यात चांगली सुधारणा होईल.

धनु राशीच्या व्यक्तीची प्रतिष्ठा वाढणार

बाबा वेंगानुसार, 8 ते 14 जूनपर्यंतचा आठवडा अनेक दृष्टीने शुभ आहे. अनेक वादातून मुक्ती मिळेल आणि अनेक प्रतिष्ठित लोकांची भेट होईल. जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर या आठवड्यात तुम्हाला शुभ वार्ता मिळेल. जे नोकरी करता आहेत, त्यांना कार्यालयात नवीन जबाबदारी मिळेल. त्यांना पदोन्नतीचे योगही दिसत आहेत. आर्थिक परिस्थितीत मोठी सुधारणा होईल. अडकलेला पैसा हाती येईल. तर धार्मिक प्रवासही घडू शकतो.

मीन राशीसाठी मोठी संधी

बाबा वेंगानुसार, मीन राशीच्या लोकांसाठी 8 ते 14 जूनपर्यंतचा आठवडा एकदम लाभदायक असेल. व्यवसाय आणि नोकरीत सकारात्मक परिणाम दिसतील. अनेक दिवसांचे स्वप्न पूर्ण होईल. महत्त्वाच्या योजना मार्गी लागल्याने मोठा दिलासा मिळेल. प्रेमात एखादं गिफ्ट मिळालं तर आश्चर्य वाटू देऊ नका. परदेशी जाण्याची योजनाही फलद्रुप होऊ शकते. अचानक जुन्या मित्राचा फोन येईल अथवा भेट होईल.

(डिस्क्लेमर : बाबा वेंगा यांची भविष्यवाणी ही केवळ माहिती म्हणून देण्यात येत आहे. टीव्ही ९ मराठी त्याविषयी कोणताही दावा करत नाही.)

Follow Us