अंथरुणावर असताना या 6 गोष्टी कधीही करू नका; अन्यथा तुमचं नशीब तुम्हीच खराब कराल

वास्तुशास्त्रानुसार अंथरुणावर काही गोष्टी करणे अशुभ मानले जातात. पलंगावर किंवा अंथरुणाच्याबाबतीत अशा अनेक गोष्टी वास्तूशास्त्रात सांगितल्या गेल्या आहेत त्याचे नियम पाळले नाहीत तर त्याचे नकारात्मक परिणाम आयुष्यावर होतात. त्यासाठी पलंगावर बसून किंवा अंथरुणावर बसून कोणत्या गोष्टी करू नये याबाबत जाणून घेऊयात.

अंथरुणावर असताना या 6 गोष्टी कधीही करू नका; अन्यथा तुमचं नशीब तुम्हीच खराब कराल
Bedroom Vastu Avoid These 6 Mistakes For Positive Energy & Good Fortune
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 13, 2025 | 2:54 PM

वास्तूशास्त्रात अनेक गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. घरातील प्रत्येक कोपऱ्यापासून ते किचनपर्यंत सगळ्यांचे शास्त्र असतं. वास्तूशास्त्रात अंथरूणाबाबत तसेच पलंगाबाबतही अनेक गोष्टी किंवा नियम सांगण्यात आले आहे. जे पाळले तर नक्कीच त्याचा आपल्या आयुष्यात परिणाम पाहायला मिळतात. अनेकदा आपण मोठ्यांकडून हे ऐकलं असेल की पलंगावर किंवा अंथरूणावर काही गोष्टी करू नये. पण अनेकदा, जाणूनबुजून किंवा नकळत, आपण अशा गोष्टी करतो ज्यामुळे जीवनात नकारात्मकता आणि समस्या निर्माण होऊ शकतात. जाणून घेऊयात की अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या पलंगावर किंवा अंथरुणावर करणे टाळले पाहिजे.

बेड अस्ताव्यस्त ठेवणे

काही लोक रात्री झोपल्यानंतर किंवा सकाळी देखील अंथरुण अस्वच्छ किंवा अस्ताव्यस्त ठेवतात. हे केवळ अस्वच्छ दिसत नाही तर एक विशिष्ट नकारात्मकता देखील आणते. असे म्हटले जाते की जे लोक त्यांचे अंथरुण अस्वच्छ ठेवतात त्यांना अनेकदा आरोग्य आणि आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते.

रात्रीचे जेवण अंथरुणावर जेवताना

वडीलधारी लोक अनेकदा अंथरुणावर जेवण करू नये असा सल्ला देतात. पण त्यामागे आरोग्याच्या दृष्टीनेही चांगले नाही कारण अन्नाचे कण अंथरुणावर राहू शकतात, ज्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. तसेच वास्तूच्या दृष्टीने देखील काही कारणं आहेत. असे मानले जाते की अंथरुणावर जेवल्याने घराची समृद्धी हिरावून घेतली जाते.

बेडवर बसून ऑफिसचे काम करणे

घरून काम करणे लोकप्रिय झाल्यापासून, बरेच लोक झोपेतून उठून अंघोळ न करताच तसेच पलंगावर बसून काम करू लागतात. पण तसे करणे तुमच्यासाठीच योग्य नाही. कारण ही सवय आरोग्यदायी नाही. अस्ताव्यस्त पलंगावर काम केलं तर कामाचा वेग मंदावते आणि तसेच त्याचा तुमच्या कामातील प्रगतीवर देखील नकारात्मक परिणाम होतो.

अंथरुणावर पडून पुस्तक वाचणे

अनेकांना त्यांच्या पलंगावर बसून अभ्यास करतात किंवा पुस्तके वाचत बसतात. जे पूर्णपणे चुकीचे आहे. असे केल्याने योग्य लक्ष केंद्रित करणे जमत नाही तसेच एकाग्रता कमी होते. अभ्यासही नेहमी खुर्ची आणि टेबलचा वापर करूनच करावा. तसेच पुस्तकही जर वाचायचे असेल तर ते पलंगावर झोपून अजिबात वाचू नका.

बेडसमोर आरसा ठेवणे

जर तुमच्या पलंगासमोर आरसा लावला असेल तर तो ताबडतोब काढून टाका. खरं तर, सकाळी उठल्यावर तुम्हाला सर्वात आधी आरसा दिसतो. असे म्हटले जाते की यामुळे नकारात्मकता पसरते. वास्तुनुसार, रात्रीच्या वेळी आरसे देखील नकारात्मक ऊर्जा उत्सर्जित करतात.

या गोष्टी तुमच्या आजूबाजूला ठेवून झोपू नका.

झोपताना, काही वस्तू डोक्याजवळ ठेवू नये असही म्हणतात. यामध्ये पर्स, पैसे, बूट, चाव्या, घड्याळे, नोटबुक, पुस्तके आणि मोबाईल फोन आणि लॅपटॉप सारखी इलेक्ट्रॉनिक उपकरणे समाविष्ट आहेत. हे आरोग्यासाठी हानिकारक आहे आणि वास्तुनुसार, नकारात्मकता आकर्षित करणारे देखील मानले जातात. त्यामुळे ते झोपताना थोडे दूर ठेवा.

 

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)