Vastu Shastra: हातात पैसा टिकत नाही? वारंवार आर्थिक अडचणी येतात? मग हे उपाय कराच
वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये तुमच्या आयुष्यात निर्माण होत असलेल्या किंवा झालेल्या अनेक समस्यांवर उपाय सांगण्यात आले आहेत. वास्तुदोषामुळे अशाप्रकारच्या अडचणी येऊ शकतात. घरातील वास्तुदोष कसा दूर करायचा? याबद्दल वास्तुशास्त्रामध्ये मार्गदर्शन करण्यात आलं आहे.

आपल्या हातून नकळतपणे अशा काही छोट्या-छोट्या चुका होत असतात, ज्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होत असतो. वास्तुदोषामुळे घरात अनेक समस्या निर्माण होतात. जर तुमच्या घरात वास्तुदोष असेल तर तुम्हाला अनेक संकटांचा सामना करावा लागू शकतो. जसं की घरात कोणतंही कारण नसताना भांडणं होत राहतात, पती -पत्नीमध्ये मतभेद निर्माण होतात, अचानक आर्थिक अडचणी येतात. मात्र हे नेमकं कशामुळे होतं हे आपल्या लक्षात येत नाही. मात्र या समस्यांमागे अनेकदा तुमच्या घरात निर्माण झालेला वास्तुदोष देखील कारणीभूत असू शकतो. वास्तुशास्त्रामध्ये असे अनेक सोपे-सोपे उपाय सांगण्यात आले आहेत, ज्यामुळे तुमच्या घरातील वास्तुदोष दूर होऊन, तुमच्या घरात सुख, समृद्धी निर्माण होते. वास्तुशास्त्र हे सकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक ऊर्जा या दोन आधारावर कार्य करतं. चला तर मग जाणून घेऊयात या सोप्या उपायांबद्दल.
बंद घड्याळ – सर्वात प्रथम जर तुमच्या घराच्या भिंतीवर बंद घड्याळ असेल तर ते काढून टाका, किंवा ती लगेच दुरूस्त करा, कारण वास्तुशास्त्रानुसार बंद घड्याळ हे भिंतीवर असणं अशुभ मानलं जातं. घड्याळाचा संबंध हा वेळेशी असतो, त्यामुळे वेळ ही नेहमी प्रवाही ठेवण्यासाठी भींतीवर कधीही बंद घड्याळ असू नये, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. बंद घड्याळामुळे घरात नकारात्मक ऊर्जा तयार होते.
जुने किंवा वापरात नसलेले नाणे – अनेकांना जुन्या आणि सध्या चलनात नसलेल्या नाण्यांचा संग्रह करून ठेवण्याची सवय असते. मात्र वास्तुशास्त्रानुसार त्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो. त्यामुळे घरात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. जर तुमच्याकडेही अशी नाणी असतील तर त्यांना गंगेमध्ये किंवा वाहात्या पाण्यात सोडून दिले पाहिजे असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.
फाटलेल्या चादरी वापरू नका – वास्तुशास्त्रानुसार कधीही फाटलेल्या चादरींचा वापर अंथरण्यासाठी किंवा पांघरण्यासाठी करू नये. यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो, अनेक प्रकारच्या अडचणी निर्माण होऊ शकतात, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
