Vastu Shastra : नवं वर्षाच्या पहिल्या दिवशी करा तुळशी संबंधी हा सोपा उपाय, वर्षभर जाणवणार नाही पैशांची तंगी
नवीन वर्ष सुरू होण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. वास्तुशास्त्रामध्ये असे अनेक सोपे उपाय सांगण्यात आले आहेत, जे नवनी वर्षाच्या पहिल्या दिवशी केल्यास घरातील सर्व प्रकारची आर्थिक अडचण दूर होते. घरात सुख समृद्धी येते. त्याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत.

हिंदू धर्मामध्ये तुळशीला अत्यंत पवित्र मानलं गेलं आहे. त्यामुळे सर्वसामान्यपणे आपल्याला प्रत्येक हिंदू कुटुंबाच्या दारात तुळस दिसते. तुळशीचं केवळ अध्यात्मिक महत्त्वच नाही तर आयुर्वेदिक महत्त्व देखील आहे. आयुर्वेदामध्ये तुळशीचे अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. आज आपण तुळशीचं धार्मिक महत्त्व जाणून घेणार आहोत. तुळस ही माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचं सर्वात प्रिय झाड आहे. ज्या घरात तुळस असते, त्या घरामध्ये कधीही पैशांची अडचण भासत नाही, त्या घरावर सदैव लक्ष्मी माता आणि भगवान विष्णू यांचा आशीर्वाद राहतो. असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. आज आपण तुळशीचे असे काही सोपे उपाय जाणून घेणार आहोत, जे तुम्ही नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी केल्यास तुम्हाला वर्षभर आर्थिक तंगी जाणवणार नाही, तुमची प्रगती होईल, लक्ष्मी माता आणि भगवान विष्णू यांचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहील.
पंचागानुसार आता नवीन वर्ष सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. आपण लवकरच एका नव्या वर्षामध्ये पदार्पण करणार आहोत. ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रानुसार जर वर्षाच्या पहिल्या दिवशी तुळशीची पूजा केली आणि काही सोपे उपाय केले तर येणारं वर्ष हे तुम्हाला सुखा-समाधानाचं जातं. घरात गृहकलह होत नाही. घरात सुख-समृद्धी राहते. तसेच हातामध्ये पैसा टिकून राहतो. चला तर मग जाणून घेऊयात 2026 च्या पहिल्या दिवशी तुळशी संबंधित कोणते उपाय केले पाहिजेत? त्याबद्दल.
पिवळा धागा – नव वर्षाचा पहिला दिवस अत्यंत शुभ असतो. त्यामुळे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तुळशीला पिवळा धागा बांधला पाहिजे. वास्तुशास्त्रानुसार जर नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तुळशीला पिवळा धागा बांधला तर घरातील सर्व आर्थिक अडचणी दूर होतात. नवं वर्ष हे आनंदाचं सुख -समाधानाचं जातं. या सोप्या उपायामुळे वर्षभर लक्ष्मी माता आणि भगवान विष्णू यांची कृपा तुमच्यावर राहाते.
दूध किंवा पंचामृत अर्पण करा – वर्षाच्या पहिल्या दिवशी तुळशीला पंचामृत किंवा दूध अर्पण करावे, यामुळे तुमचे सर्व कष्ट दूर होतात. येणारं वर्ष तुमच्यासाठी प्रगती घेऊन येतं.आर्थिक तंगी दूर होते. तुमच्यावर असलेलं कर्ज देखील फिटतं अशी मान्यता आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
