H-1B आणि H-4 व्हिसात काय फरक आहे ? अमेरिकेत जाऊ इच्छीणाऱ्यांनो आता हे काम करा…
अमेरिकेने H-1B आणि H-4 व्हिसाच्या नियमात बदल केले आहेत. आता भारतीयांना अमेरिकेत जाण्यासाठी हे दोन्ही व्हिसा मिळवणे गरजेचे असते. या दोन व्हिसात काय फरक आहे आणि नियम काय आहेत पाहूयात...

अमेरिकेत काम किंवा अभ्यासासाठी जाणाऱ्या भारतीयांच्या चिंतेत वाढ झाली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने व्हिसाच्या नियमात बदल केले आहेत. त्यामुळे H-1B आणि H-4 व्हिसाच्या अर्जदारांना आता आपले सोशल मीडिया अकाऊंट सार्वजनिक करावे लागेल. या नियमांना लागू केल्यानंतर अनेक भारतीयांची नोकरी, शिक्षण, खाजगी प्रवास आणि फॅमिली प्लानवर संकट आले आहे. नव्या नियमांना 15 डिसेंबर 2025 पासून लागू केले जाणार आङे. त्यामुळे भारतीयांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. चला तर पाहूयात H-1B आणि H-4 व्हिसामध्ये काय फरक आहे.
H-1B व्हिसा त्या भारतीयांसाठी आहे जे अमेरिकेत नोकरी करु इच्छीत आहेत. तर H-4 व्हिसा त्या कुटुंब सदस्यांसाठी आहे जे H-1B व्हिसा धारकासोबत अमेरिकेत रहातात.नवीन नियमांनुसार आता दोन्ही व्हिसा अर्जदारांना त्यांच्या सोशल अकाऊंट उदा.फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि लिंक्डइनला अमेरिकेच्या व्हिसा अधिकाऱ्यांना पाहण्यासाठी सार्वजनिक करावे लागेल. हा नियम नवीन अपॉईंटमेंट आणि व्हिसा रिन्यू दोन्हीसाठी लागू होणार आहे.
आकडे काय म्हणतात ?
भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या H-1B व्हिसा धारकांची संख्या सर्वात जास्त आहे. आकड्यांनुसार अमेरिकेत जारी होणाऱ्या H-1B व्हिसापैकी सुमारे 70 टक्के भारतीयांना मिळतात.तर H-4 व्हिसावर काम करणारे सुमारे 90 टक्के भारतीय आहेत. हे लोक अमेरिकेत नोकरी करतात. आणि तेथे घर खरेदी करतात आणि त्यांच्या मुलाच्या शिक्षणाचा खर्च उचलतात. त्यामुळे या नव्या नियमांनुसार त्यांची नोकरी आणि कायदेशीर स्थिती प्रभावित होण्याचा धोका आहे.
भारतीयांसाठी हे खूपच गरजेचे
भारतात हाय स्किल्ड व्हिसाधारकांसाठी H-1B आणि H-4 व्हिसाचे महत्व प्रचंड आहे. H-1B व्हिसामुळे अमेरिकेत तरुण त्यांच्या करीयरची सुरुवात करु शकतात. आणि टेक कंपन्या, इंजिनिअरिंग आणि आयटी सेक्टरमध्ये संधी मिळवू शकतात. H-4 व्हिसा धारक कौटुंबिक सदस्य आहेत, ज्यांची नोकरी आणि शिक्षणाती स्थिती देखील या व्हिसाशी जोडलेली आहे. या नवीन नियमांमुळे त्या लोकांना अमेरिकेत काम किंवा शिक्षण सुरु ठेवणे कठीण झाले आहे.
काय म्हणातात एक्सपर्ट्स
या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते व्हिसासाठी अर्ज करणाऱ्यांना आता अधिक सावध रहावे लागेल, सोशल मीडियावर शेअर केलेले फोटो, पोस्ट किंवा लाईक्स देखील अधिकाऱ्यांच्या नजरेत येऊ शकतात. यामुळे प्रत्येक व्यक्तीला त्याचा डिजिटल प्रोफाईल स्वच्छ ठेवावे लागेल. आणि केवळ प्रोफेशनल माहिती शेअर करणे गरजेचे होईल.
