मला भेटायला या ना… सुंदर DSP चा बिझनेस मॅनववर लव्ह ट्रॅप, चॅटिंग व्हायरल झाल्याने खळबळ!
२०२१ पासून छत्तीसगढच्या डीएसपी आणि उद्योगपती दीपक टंडन यांचे प्रेमसंबध होते. पण या चार वर्षात महिलेने जे काही केलं ते ऐकून अनेकांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे.

गेल्या दोन-तीन दिवसांपासून सोशल मीडियावर छत्तीसगडच्या एका डीएसपी आणि एका कोट्यवधी रुपयांच्या बिझनेसमॅनचे व्हॉट्सअॅप चॅट प्रचंड व्हायरल होत आहे. छत्तीसगड पोलिसांच्या डीएसपी कल्पना वर्मा आणि उद्योगपती दीपक टंडन यांची लव्ह स्टोरी, खरंतर ‘लव्ह ट्रॅप’ची जोरदार चर्चा आहे. एका उद्योगपत्याची आणि डीएसपी यांची प्रेमकहाणी आता सस्पेन्स, थ्रिलर आणि फसवणुकीने भरलेली असल्याचे समोर आहे. दोघांचे फोटो, व्हॉट्सअॅप चॅट्स, व्हिडीओ आणि कागदपत्रे लीक होत आहेत. उद्योगपती स्वतःला फसवले गेल्याचे सांगत पोलीस ठाण्यात तक्रार करत फिरतोय, पण आतापर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही. आता हे नेमकं प्रकरण काय आहे चला जाणून घेऊया…
गेल्या काही दिवसांपासून छत्तीसगढमधील डीएसपी कल्पना वर्मा आणि उद्योगपची दीपक टंडन यांची लव्हस्टोरी चांगलीच चर्चेत आहे. दीपक टंडनने काही व्हॉट्सअॅप चॅट्स मीडिया समोर आणले आहेतय या चॅटमध्ये कल्पना पैशांची मागणी आणि दीपकला पत्नीला घटस्फोट घेण्यास सांगताना दिसत आहे. तसेच समोर आलेल्या चॅट्समध्ये ती दीपकला मला भेटायला या ना…, पत्नीला घटस्फोट द्या, आपण एकत्र राहू… मी तुम्हाला कधीही सोडून जाणार नाही असे बोलताना दिसत आहे.
कल्पना वर्मा कोण आहेत, ज्यांच्यावर गंभीर आरोप लागले आहेत?
छत्तीसगडच्या दंतेवाड्यात कार्यरत असलेल्या डीएसपी कल्पना वर्मा सध्या सोशल मीडियावर चांगल्याच चर्चेत आहेत. कल्पना वर्मा आणि स्थानिक कोट्यधीश उद्योगपती दीपक टंडन यांचे संबंध आता फक्त प्रेमकहाणीपुरते मर्यादित राहिलेले नाहीत, तर लव्ह, सेक्स, धोका आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणात बदलले आहेत. उद्योगपती दीपक टंडन याने डीएसपीवर नात्याचा गैरफायदा घेऊन 2 कोटी रुपये रोख आणि मौल्यवान वस्तू फसवून घेतल्याचा आरोप केला आहे.
दोघांमध्ये प्रेम कसे झाले?
२०२१ पासून सुरू झालेले हे नाते आता उघड झाले आहे. डीएसपी कल्पना वर्मांच्या एकापेक्षा एक सरस व्हॉट्सअॅप चॅट्समुळे केवळ छत्तीसगडच नव्हे तर संपूर्ण देशात चर्चा रंगली आहे. सुरुवातीला दोघांमध्ये मैत्री झाली, जी हळूहळू खोलवरच्या नात्यात बदलली. दीपक टंडनचा आरोप आहे की, याच काळात डीएसपीने विविध सबबी सांगून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे आणि महागड्या भेटवस्तू घेतल्या.
व्हॉट्सअॅप चॅट कोणी लीक केली?
उद्योगपतीचा दावा आहे की त्याने डीएसपी कल्पना वर्मांना अनेक हप्त्यांत २ कोटी रुपये रोख दिले. याशिवाय हिऱ्याची अंगठी, सोन्याची साखळी आणि एक महागडी गाडीही डीएसपीने घेतली. पण सर्वात गंभीर आरोप असा की, डीएसपीने दीपकच्या एका हॉटेलची रजिस्ट्री आपल्या भावाच्या नावावर करून घेतली. हा प्रकार डीएसपीच्या हेतूंवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे करतो.
