AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bhadrapada 2022: आजपासून सुरु होतोय उत्तर भारतीयांचा भाद्रपद महिना, काय आहे या महिन्याचे वैशिष्ट्य?

यावेळी भाद्रपद महिना 13 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर पर्यंत असेल. आपल्या चुकांचे प्रायश्चित करण्यासाठी हा सर्वोत्तम महिना आहे. भाद्रपद म्हणजे उत्तम फळ देणारा व्रतांचा महिना. या महिन्यात लोकं व्रत आणि उपवास करतात. या महिन्यात येणारे व्रत पाळल्यास मन शुद्ध आणि आत्मा पवित्र होते अशी मान्यता आहे.

Bhadrapada 2022: आजपासून सुरु होतोय उत्तर भारतीयांचा भाद्रपद महिना, काय आहे या महिन्याचे वैशिष्ट्य?
भाद्रपद महिना २०२२
| Updated on: Aug 13, 2022 | 2:58 PM
Share

Bhadrapada 2022:  सण आणि उत्सवाचा महिना म्हणजेच भाद्रपद महिना. उत्तर भारतीयांचा श्रावण महिना आजपासून म्हणजेच 13 ऑगस्ट पासून सुरु होतोय. 10 सप्टेंबरपर्यंत असणाऱ्या या महिन्यात गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi 2022)  हा मोठा सण साजरा केला जातो. श्रीकृष्ण जन्मोत्सव (shri krishna janmashtami 2022) आणि कलंक चतुर्थीही याच महिन्यात येते. यावेळी भाद्रपद महिना 13 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर पर्यंत असेल. आपल्या चुकांचे प्रायश्चित करण्यासाठी हा सर्वोत्तम महिना आहे. भाद्रपद म्हणजे उत्तम फळ देणारा व्रतांचा महिना. या महिन्यात लोकं व्रत आणि उपवास करतात. या महिन्यात येणारे व्रत पाळल्यास मन शुद्ध आणि आत्मा पवित्र होते अशी मान्यता आहे.  या महिन्यात गणेश चतुर्थी हा मोठा सण साजरा केला जातो.

भाद्रपद महिन्याचे नियम

भाद्रपद महिन्यात कच्च्या गोष्टी खाणे टाळावे. दही वापरण्यास सक्त मनाई आहे. या महिन्यात दोन्ही वेळा थंड पाण्याने आंघोळ करावी, त्यामुळे आळस दूर राहतो. भाद्रपद महिन्यात भगवान श्रीकृष्णाला तुळशीची  अर्पण करणे शुभ मानतात.

भाद्रपद महिन्यातील महत्त्वाचे सण

या महिन्यात गणेश चतुर्थी आणि गणेशोत्सव येतो. श्रीकृष्ण, बलराम आणि राधा यांची जयंतीही याच महिन्यात येते. मथुरा -वृंदावन आणि उत्तर भारतातील अनेक भागात जन्माष्टमीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. याच महिन्यात महिलांच्या सौभाग्याचा सण हरितालिका येते. या महिन्यात अनंत पुण्य प्राप्तीचा सण अनंत चतुर्दशी देखील येतो.

श्रीकुष्णाच्या भक्तीचा महिना

या महिन्यात दही वापरण्यास मनाई आहे, परंतु श्रीकृष्णाला संपूर्ण महिना पंचामृताने स्नान घातले तर सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात. ज्या लोकांना अपत्य सुख नाही, अशा लोकांनी या महिन्यात श्रीकृष्णाच्या जयंतीला व्रत करावे. आत्मविश्वास वाढवण्यासाठी श्रीमद भगवद्गीतेचे पठण या महिन्यात शुभ फल देते. या महिन्यात लाडू गोपाळ आणि शंखाची स्थापना केल्याने घरात ऐश्वर्य आणि समृद्धी येते.

श्रीगणेशाच्या उपासनेचा महिना

बुद्धी आणि ज्ञानासाठी या महिन्यात श्रीगणेशाची उपासना करा. पिवळ्या रंगाच्या गणपतीची स्थापना करा. त्यांना दररोज सकाळी दुर्वा आणि मोदक अर्पण करा. महिनाभर सात्विक रहा. सर्व प्रकारचे अडथळे नष्ट होतील.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका.
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?.
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.