पाकिस्तान भयंकर अडकला, पळता भुई कमी, संरक्षण करारानंतर मोठ्या हल्ल्याची धमकी, थेट..
पाकिस्तान सध्या चांगलाच अडचणीत सापडला आहे. पाकिस्तानला थेट हल्ल्याची धमकी देण्यात आली. भारतापासून वाचण्यासाठी पाकिस्तानने संरक्षण करार केला. पण त्यात आता पाकिस्तान खतरकनाक अडकल्याचे बघायला मिळत आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात ऑपरेशन सिंदूर सुरू केले. यानंतर पाकिस्तानला पळता भुई कमी झाली. भारतासमोर आपण एकटे आता कधीच लढू शकत नसल्याचे पाकिस्तानच्या लक्षात आले. त्यानंतर पाकिस्तानने थेट काही मुस्लीम देशांचे पाय पकडत थेट संरक्षण करार केला. मक्का संरक्षण करार असे नाव त्याला देण्यात आले. एका कोणत्या देशावर हल्ला म्हणजे या सर्व देशांवर हल्ला समजला जाणार असल्याचे कराराच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आले. आता मक्का संरक्षण करारानंतर पाकिस्तानच्या अडचणीत मोठी वाढ झाली. थेट हूतीकडून पाकिस्तानला हल्ल्याची धमकी देण्यात आली. संरक्षण करार करणे पाकिस्तानवरच भारी पडले. भारताविरोधात इतर देशांना उभे करण्यासाठी हा संरक्षण करार पाकिस्तानने केला. पण पाकिस्तानच यात अडकला आहे.
अमेरिकेचे माजी सुरक्षा सल्लागार लेफ्टिनेंट जनरल एचआर मॅकमास्टर यांनी म्हटले की, या करारामागे पाकिस्तानची भूमिका अजिबात चांगली नाही. 7 ऑगस्ट रोजी पाकिस्तानने सऊदी अरेबिया, पाकिस्तान आणि तुर्की यांच्यासोबत संरक्षण करार केला. एका देशावर हल्ला म्हणजे तीन देशांवर हल्ला समजला जाणार. त्यातच आता हुतींनी मोठा हल्ला करण्याची धमकी या संरक्षण करारानंतर दिली.
हूती नेता अल बुखैती यांनी म्हटले की, इस्लामाबाद आणि अंकारा समोरासमोर येतील, त्यांच्यावरही थेट हल्ला करणार. यमन आता रक्षात्मक गोष्टीकडे वाटचाल करत आहे. पाकिस्तान आणि तुर्कीसाठी हा मोठा इशारा आहे. यमन कोणत्याही विदेशी ताकदीला अजिबात सहन करणार नाही. पाकिस्तानने सुरूवातीला इराण आणि अमेरिका युद्धात मध्यस्थी करण्यासाठी पुढाकार घेतला.
जगाला दाखवले जात होते की, आम्ही युद्ध थांबवत आहोत. पण पाकिस्तानच या अडकला. इराण आणि अमेरिका युद्धात आपण मध्यस्थी करत असल्याचे त्यांच्याकडून दाखवले जात होते. मात्र, दुसरीकडे थेट इराणचे लढाऊ किमान पाकिस्तानने आपल्या लष्कर तळावर लपून ठेवले, ज्याचे व्हिडीओ पुढे आले आणि एकच खळबळ उडाली. पाकिस्तान आताही चांगलाच अडकल्याचे बघायला मिळतंय. पाकिस्तानकडून हा करार भारतापासून वाचण्यासाठी करण्यात आला. मात्र, आता अडकला.
