
नारळ म्हणजेच श्रीफळामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश राहतात. कोणत्याही कामाची सुरुवात नारळ फोडून केली जाते. तुम्हीही नवीन वर्षाची सुरुवात श्रीफळाने करावी. त्यामुळे त्रिदेवांचा आशीर्वाद देतात. या सर्वामुळे तुमचे नविन वर्ष उत्साहात साजरे होईल.

नवीन वर्षात मोराचे पिसे देखील खूप शुभ मानले जातात. नवीन वर्षाच्या निमित्ताने तुम्ही घरी मोराची पिस घेऊन आलात तर यामुळे तुमचे भाग्य उचळून निघेल.

स्वस्तिकचा संबंध गणपतीशी आहे. हिंदू धर्मात स्वस्तिक शुभ मानले जाते. अशा परिस्थितीत तुम्ही नवीन वर्षाच्या निमित्ताने स्वस्तिक आणू शकता. यामुळे घरातील नकारात्मकता दूर होईल.

घरातील लोकांच्या प्रगतीशी, कौटुंबिक शांती, सुख-समृद्धीशी कासवाचा संबध आहे. त्यामुळे घरात सुख-समृद्धी येते. याचा घरातील सदस्यांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो.