AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Buddha Purnima 2023 : या दिवशी साजरी होणार बुद्ध पौर्णिमा, महत्त्व आणि उपासनेची पद्धत

बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी गौतम बुद्धांची उपासना केल्याने व्यक्तीचा आत्मविश्वास आणि प्रतिष्ठा वाढते. त्याच्या जीवनात समृद्धी आणि आनंद वाढतो. याशिवाय बुद्ध पौर्णिमेला व्रत केल्याने व्यक्तीच्या पापांचा नाश होतो आणि तो मोक्षमार्गाकडे वाटचाल करतो.

Buddha Purnima 2023 :  या दिवशी साजरी होणार बुद्ध पौर्णिमा, महत्त्व आणि उपासनेची पद्धत
भगवान बुद्धाImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Apr 23, 2023 | 3:50 PM
Share

मुंबई : वैशाख पौर्णिमा 5 मे 2023 रोजी आहे, या दिवशी बौद्ध धर्माचे संस्थापक भगवान गौतम बुद्ध यांची जयंती साजरी केली जाते. याला बुद्ध पौर्णिमा (Buddha Purnima 2023) आणि बुद्ध जयंती असेही म्हणतात. वर्षातील पहिले चंद्रग्रहण बुद्ध पौर्णिमेला होत आहे. त्यामुळे त्याचे महत्त्व आणखी वाढले आहे. बुद्ध पौर्णिमा हा सण भारतातच नाही तर विदेशातही उत्साहात साजरा केला जातो. बुद्ध पौर्णिमेचा शुभ मुहूर्त, महत्त्व आणि उपासना पद्धती जाणून घेऊया.

बुद्ध पौर्णिमा 2023 मुहूर्त

पंचांगानुसार, वैशाख पौर्णिमा तिथी 4 मे 2023 रोजी सकाळी 11.44 वाजता सुरू होत आहे. पौर्णिमा 5 मे 2023 रोजी रात्री 11.03 वाजता समाप्त होईल. या दिवशी भगवान गौतम बुद्धांची 2585 वी जयंती साजरी केली जाईल. भगवान विष्णू, भगवान चंद्रदेव आणि माता लक्ष्मी यांची देखील पौर्णिमेच्या दिवशी पूजा केली जाते.

लाभ (प्रगती) मुहूर्त – 07.18 am – 08.58 am शुभ (सर्वोत्तम) मुहूर्त – 12.18 pm – 01.58 pm

बुद्ध पौर्णिमेचे महत्त्व

वैशाख पौर्णिमा ही भगवान बुद्धांच्या जीवनातील तीन महत्त्वाच्या गोष्टींशी निगडीत आहे – गौतम बुद्धांचा जन्म, भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती आणि बुद्धांचे निर्वाण. पिंपळाच्या झाडाखाली गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली, असे मानले जाते. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी जगभरातील बौद्ध विहारांमध्ये भगवान बुद्धांची शिकवण ऐकायला मिळते.

त्याचे सर्व अनुयायी त्याची शिकवण लक्षात ठेवतात आणि त्याची उपासना करतात. भगवान बुद्धांनी नेहमीच लोकांना सत्य आणि अहिंसेच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा दिली. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी पाण्याने भरलेला कलश दान केल्यास गाय दान केल्यासारखे पुण्य मिळते, अशी मान्यता आहे.

बुद्ध पौर्णिमा पूजा पद्धत

बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी बोधगया, बिहारमध्ये बोधिवृक्षाची पूजा केली जाते, प्रत्यक्षात ते पिंपळाचे वृक्ष आहे. या दिवशी त्याच्या मुळांमध्ये दूध आणि अत्तर टाकून दिवे लावले जातात. त्याचबरोबर अनेक लोक आपल्या परिसरातील पिंपळाची पूजा करतात. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी घरी परित्रण पाठ झाल्यावर गोड तीळ पाच किंवा सात जणांना दान करावे, असे केल्याने पापांचा नाश होतो.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
Rohit Pawar Met Tukaram Mundhe: रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा टोला
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा भाजपला जोरदार टोला
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं...
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं सडेतोड उत्तर, म्हणाल्या...
पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी सं
Chhatrapati Sambhajianagar: पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी संकटात!
सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मोठी अपडेट समोर
Satara Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मोठी अपडेट समोर
अहिल्यानगर, सांगली, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कुठे आणि कोणी बाजी?
अहिल्यानगर, सांगली, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कुठे आणि कोणी बाजी मारली? A टू Z माहिती...
कल्याणमध्ये संतापजनक घटना! 'त्या' एका कारणावरून नवऱ्याने उकळतं मटण...
कल्याणमध्ये संतापजनक घटना! 'त्या' एका कारणावरून नवऱ्याने उकळतं मटण बायको आणि लेकावर फेकलं
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! NCP नेत्यांचा अर्ज बाद; नेमकी
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! NCP नेत्यांचा अर्ज बाद; नेमकी कोणाला संधी?
पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा! राज ठाकरेंच्या उपस्थितीत खास..
पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा! राज ठाकरेंच्या उपस्थितीत खास दिनदर्शिकेचे प्रकाशन
दिया मिर्झाच्या व्हिडिओवर राजकीय टीका भोवली! मुंबई हायकोर्टाने अमित...
दिया मिर्झाच्या व्हिडिओवर राजकीय टीका भोवली! मुंबई हायकोर्टाने अमित साटम यांना फटकारले