
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य निती नावाचा ग्रंथ लिहीला. चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजही काळाशी सुसंगत वाटतात. चाणक्य हे एक अर्थतज्ज्ञ होते, त्यामुळे पैशांचा व्यवहार कसा असावा? याबाबत देखील त्यांनी आपल्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये अनेक विचार मांडले आहेत. थोडक्यात आयुष्य जगत असताना काय करावं? आणि कोणत्या चुका टाळाव्यात याबाबत चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये लिहून ठेवलं आहे.
चाणक्य म्हणतात काही माणसं ही जन्मताच धनवान असतात, मात्र आयुष्यात ते काही अशा गोष्टी करतात ज्याचा परिणाम त्यांना भोगावा लागतो. ते गरीब बनतात. तर काही लोक हे जन्माने गरीब असतात, मात्र ते त्यांच्या बुद्धीच्या जोरावर प्रचंड धन कमवतात, असे लोक हे श्रेष्ठ असतात, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. दरम्यान चाणक्य यांनी अशी काही ठिकाणं सांगितली आहे, जिथे चुकूनही न थांबण्याचा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे, अन्यथा तुम्ही देखील गरीब व्हाल असं त्यांनी म्हटलं आहे. जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे ते?
जिथे रोजगार मिळणार नाही – चाणक्य म्हणता ज्या जागी तुम्हाला रोजगार मिळणार नसेल तर अशा ठिकाणी तुम्ही चुकूनही वास्तव्य करू नका, कारण तुम्हाला जर रोजगार मिळाला नाही तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत, अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला तुमची संपत्ती विकूनच संसार करावा लागेल, त्यामुळे अशा ठिकाणी कधीही थांबू नका असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.
व्यसनाधीन लोक – चाणक्य म्हणतात ज्या जागी व्यसानाधीन लोक आहेत, अशा जागी वास्तव्य म्हणजे सर्वात मोठा धोका असतो. यामुळे तुम्हाला देखील व्यसनाची सवय लागते, तुमचं आयुष्य बरबाद होतं. पैसा मोठ्या प्रमाणात खर्च होतो.
योग्य मोबदला न मिळणं – चाणक्य म्हणतात जर तुम्हाला एखाद्या जागी कामाचा योग्य मोबदला मिळत नसेल तर तिथे चुकूनही थांबू नका, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)