
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, अर्थतज्ज्ञ होते, तसेच ते एक कुटनीती तज्ज्ञ देखील होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळातही अनेकांना मार्गदर्शक ठरतात. चाणक्य आपल्या या ग्रंथामध्ये समाधानाबाबत बोलताना म्हणतात की तुम्ही तुमच्या आयुष्यात प्रचंड धन कमावलं म्हणजेच तुम्ही समाधानी आहात, असं होत नाही. ज्याच्याकडे जेवढं जास्त धन असतं, तो सर्वाधिक असमाधानी असतो. उलट ज्याकडे काहीच नसतं असा व्यक्ती समाधानी असतो. समाधान हे तुमच्या मनाच्या शांतीवर अवलंबून असतं, जर तुम्हाला तुमचं मन शांत ठेवायचं असेल तर सर्वात आधी तुम्हाला तुमच्यामध्ये असलेल्या इच्छांना लगाम लावाला लागेल. मात्र तरी देखील काही गोष्टी अशा असतात तुम्ही तुमच्या इच्छांना कितीही आवर घातला तरी देखील तुम्ही समाधानी होऊ शकत नाहीत, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.
पैसा – चाणक्य म्हणतात पैसा ही अशी गोष्ट आहे, ती तुम्ही कितीही कमावली, तरी तुम्ही कधीच समाधानी असू शकत नाही, ज्याच्याकडे धन नाही, त्याला वाटत आपल्याकडे काही तरी धन असावं, ज्याच्याकडे थोडं धन आहे, तो आणखी धन मिळवण्याचा प्रयत्न करतो, ज्याच्याकडे धन ठेवण्यासाठी देखील जागा नाही, अशा माणसाला देखील वाटतं आपल्याकडे आणखी धन असावं, हे चक्र असंच सुरू राहतं.
स्त्री सुख – चाणक्य म्हणतात तुमची पत्नी कितीही सुंदर असली तर तुम्ही समाधानी नसता, हे कटु आहे, पण सत्य आहे. कारण तुम्ही अनेकदा तुमच्या पत्नीपेक्षा सुंदर दिसणाऱ्या इतर स्त्रीयांबद्दल विचार करता, त्यामुळे तुमचं मन अस्थिर बनतं.
आयुष्य – चाणक्य म्हणतात कोणालाच मरणाची घाई नसते, तुम्हाला कितीही आयुष्य मिळालं, तरी ते कमीच आहे, असं तुम्हाला वाटतं. आपल्याला आणखी आयुष्य मिळावं, अशी प्रत्येकाची इच्छा असते. आयुष्य कितीही मिळालं, तरी समाधान होत नाही, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
स्वादिष्ट भोजन – चाणक्य म्हणतात प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं, की आपल्याला नेहमी स्वादिष्ट भोजन मिळावं, त्यामुळे तुम्हाला जगात असा एकही व्यक्ती मिळणार नाही, जो म्हणेल की मला स्वादिष्ट भोजन नको, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)