Chanakya Niti : माणसाने आयुष्यात या चार गोष्टी नेहमी गुप्त ठेवाव्यात, चाणक्य काय म्हणतात?

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटुनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. चाणक्य म्हणतात आपल्या आयुष्यात अशा काही गोष्टी असतात, ज्या नेहमी गुप्त ठेवल्या पाहिजेत. जर तुम्ही त्या इतरांना सांगितल्या तर तुम्ही अडचणी सापडू शकता.

Chanakya Niti : माणसाने आयुष्यात या चार गोष्टी नेहमी गुप्त ठेवाव्यात, चाणक्य काय म्हणतात?
Chanakya Niti
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 04, 2026 | 7:27 PM

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी पैशांसंदर्भात अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, जसं की पैशांची बचत कशी करावी? पैसा कुठे खर्च करावा आणि कुठे खर्च करू नये, दान कुठे करावं आणि कुठे करू नये? याबद्दल देखील चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये माहिती दिली आहे. चाणक्य हे एक कुटनीती तज्ज्ञ होते. चाणक्य म्हणतात प्रत्येकाच्या आयुष्यात अशा काही गोष्टी असतात, ज्या तुम्ही कधीच कोणाला सांगता कामा नये. जर तुम्ही इतर लोकांना या गोष्टी सांगितल्या तर ते लोक तुमचा फायदा घेऊ शकतात. त्यामुळे अशा गोष्टी गुप्त ठेवण्यातच तुमचं हीत आहे, चला तर मग जाणून घेऊयात आर्य चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

धन – चाणक्य म्हणतात तुमच्याकडे संपत्ती किती आहे, तुम्ही किती कमावता? तुमचा पगार किती आहे? या गोष्टी नेहमी गु्प्तच ठेवल्या पाहिजेत. कारण तुम्ही जेव्हा अशा गोष्टी एखाद्या व्यक्तीला सांगता तेव्हा त्याच्या मनात तुमच्याबद्दल मत्सर निर्माण होऊ शकतो, तो तुमच्याविरोधात कट रचन्याची देखील शक्यता असते, त्यामुळे संपत्तीविषयक सर्व बाबी या गुप्तच ठेवाव्यात असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

कमजोरी – चाणक्य म्हणतात जर तुमची एखादी कमजोरी असेल तर तुमच्या कितीही जवळचा माणूस असू द्या, अगदी तुमच्या खूप जवळचा मित्र, नातेवाईक किंवा बायको अशा कोणालाच तुमची कमजोरी सांगू नका, कारण हे जर तुमच्या शत्रूला कळालं तर तो तुमच्या कमजोरीचा फायदा होऊ शकतो. तुम्हाला तो तुमच्या कमजोरीचा फायदा घेऊन सहज हरवू शकतो, त्यामुळे कधीही कोणासोबत चर्चा करू नका.

कर्ज – चाणक्य म्हणतात तुमच्यावर किती कर्ज आहे? याबद्दल देखील कोणालाच कधी सांगू नका, कारण जोपर्यंत लोकांना असं वाटतं की तुमच्याकडे खूप पैसा आहे, तोपर्यंत लोक तुमची इज्जत करतात, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

घरातील भांडणं – चाणक्य म्हणतात कधीही तुमच्या घरातील भांडणांबाबत किंवा वादाबाबत बाहेरच्या लोकांसोबत चर्चा करू नका. कारण त्यामुळे तुमच्या घरातील भांडणं आणखी वाढू शकतात.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us