
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, त्यांनी आपल्या चाणक्य नीतीमध्ये जे विचार मांडले आहेत, ते आजच्या काळातही कालबाह्य झालेले नाहीत, माणसानं आदर्श जीवन कसं जगावं? याबद्दल चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात माणसानं नेहमी काळाची पावलं ओळखली पाहिजेत. जो व्यक्ती काळाची पावलं ओळखून त्याप्रमाणे मार्गक्रमण करतो, तो त्याच्या जीवनात यशस्वी होतो, आयुष्यात त्याच्यावर कधीही पश्चाताप करण्याची वेळ येत नाही, मात्र जो माणूस आयुष्याची लढाई लढताना बेसावध असतो, तो सहज कोणाच्याही गळाला लागतो, आणि आपल्याच हातानं आपलं मोठं नुकसान करून घेतो. तुमच्या आयुष्यात तुम्हाला असे अनेक लोक भेटतात, जे केवळ स्वार्थापोटी तुमच्याजवळ आलेले असतात, अशी माणसं त्यांचा स्वार्थ पूर्ण होताच तुमची साथ सोडून जातात, अशा माणसांमुळे तुमची मोठी फसवणूक होऊ शकते, त्यामुळे अशी माणसं तुम्हाला ओळखता आली पाहिजेत. जगात अशा तीन गोष्टी आहेत, ज्यामध्ये तुम्ही नेहमी सावधगिरी बाळगली पाहिजे, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
अपमान गृहित धरू नका – चाणक्य म्हणता तुम्हाला तुमच्या आयुष्यात अनेकदा अशी लोक भेटतात जी विनोदाच्या नावाखाली तुमचा अपमान करतात, अशी लोक नेहमी तुमचा तिरस्कार करत असतात. त्यांना तुमची प्रगती पहावत नाही, अशी लोक खूप घातकी असतात, त्यामुळे जर विनोदाच्या नावाखाली कोणी तुमचा अपमान करण्याचा प्रयत्न करत असेल तर वेळीच सावध व्हा, अशा व्यक्तीला जशासतसं उत्तर द्या, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
पैशांची बचत – चाणक्य म्हणतात पैशांच्या व्यवहारामध्ये माणसानं नेहमी सावधगिरी बाळगली पाहिजे, कारण जगात पैसा हेच सर्व काही आहे, हे जरी सत्य नसलं तरी देखील पैसा ही एकमेव अशी गोष्टी आहे, जी तुम्हाला या जगात जिवंत ठेवू शकते. जर तुमच्याकडे पैसा असेल तर सर्व लोक तुमच्या मागे-पुढे करतात. तुम्हाला समाजात मान-सन्मान मिळतो, तुमच्या अनेक दु:खाचं मुळ कारण हे पैसा हाच आहे. जर तुमच्याकडे पैसा असेल तर तुमच्यावर येणारी अर्धी संकटे येण्याआधीच गायब होतात, व जी येतात त्या संकटावर तुम्ही तुमच्याकडे असलेल्या पैशांच्या मदतीने मात करू शकतात. त्यामुळे पैशांची बचत करताना नेहमी सावधगिरी बाळगावी.
पैशांची उधळपट्टी – चाणक्य म्हणतात माणसानं आयुष्यात कधीही पैशांची उधळपट्टी करू नये, आपल्याकडे असलेला पैसा जपून खर्च करावा, योग्य त्याच कारणासाठी पैसा खर्च करावा, पैसा खर्च करताना सावधगिरी बाळगावी.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)