
आर्य चाणक्य हे एक महान अर्थतज्ज्ञ, कूटनीती तज्ज्ञ आणि विचारवंत होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रथांमध्ये त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, हा ग्रंथ आजही अनेकांना आपलं जीवन जगताना मार्गदर्शक ठरतो. आपला मित्र कसा ओळखायचा, शत्रू कोणाला म्हणावे, आयुष्य जगत असताना कोणत्या चुका टाळाव्यात, कोणत्या गोष्टी कराव्यात? आदर्श पत्नी कोणाला म्हणावे? आदर्श पत्नीची लक्षण काय आहेत? आदर्श पती कोणाला म्हणावे? पतीची कर्तव्य काय आहेत? राज कसा असावा? प्रजा कशी असावी? राज्य कारभार कसा करावा अशा अनेक गोष्टींवर आर्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथात चर्चा केली आहे.
चाणक्य नीती या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी मानवाची काही लक्षणं देखील सांगितली आहेत. चाणक्य म्हणतात प्रत्येक माणसाचा स्वभाव हा वेगवेगळा असतो. मात्र जे लोक अंहकारी असतात, मूर्ख असतता आणि लोभी असतात ते आपल्या आयुष्यात कधीच सुधारू शकत नाहीत, असं आर्य चाणक्य यांनी म्हटलं आहे.
आर्य चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं?
आर्य चाणक्य म्हणतात जे व्यक्ती लोभी असतात ते कधीच सुधारू शकत नाहीत, तुम्ही त्यांच्यावर कितीही विश्वास ठेवा मात्र ते त्यांच्या लोभासाठी तुमचा विश्वासघात करणार म्हणजे करणारच असं आर्य चाणक्य यांनी म्हटलं आहे. त्यांच्यासाठी त्यांचा स्वार्थच महत्त्वाचा असतो.
चाणक्य म्हणतात जे लोक अंहकारी असतात ते देखील कधीच बदलू शकत नाहीत, त्यांच्यासाठी त्यांचा अहंकार हेच सर्व काही असतं, अशा लोकांपासून दूर राहण्यातच तुमचं भलं आहे, असं आर्य चाणक्य यांनी म्हटलं आहे.
मुर्ख लोक – आर्य चाणक्य म्हणतात मुर्ख लोकांपासून तुम्ही चार हात दूरच राहा, मुर्ख लोकांना सल्ला देनं म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी ओतण्यासारखं असतं. तुम्ही त्यांना कितीही उपदेश करा त्याचा काहीही फायदा होत नाही, उलट त्यांच्यामुळे तुमचंच नुकसान होण्याची शक्यता असते.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)