Chanakya Niti : आर्य चाणक्य म्हणतात या लोकांना चुकूनही देऊ नका तुमच्या मेहनतीची कमाई, नाहीतर होईल पश्चताप

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ आजही अनेकांना आपलं जीवन जगताना मार्गदर्शक ठरतो.

Chanakya Niti : आर्य चाणक्य म्हणतात या लोकांना चुकूनही देऊ नका तुमच्या मेहनतीची कमाई, नाहीतर होईल पश्चताप
| Updated on: May 09, 2025 | 9:52 PM

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ, कुटनीती तज्ज्ञ आणि राजनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली आहे, हा ग्रंथ आजही अनेकांना आपलं जीवन जगताना मार्गदर्शक ठरतो. आर्य चाणक्य यांनी या ग्रंथामध्ये अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत, जसं की राजा कसा असावा? त्याने आपल्या प्रजेसोबत कसा व्यवहार केला पाहिजे? आयुष्य जगत असताना काय करावं? कोणत्या चुका टाळव्यात, आपला खरा मित्र कसा ओळखावा? आपला शत्रुची ओळख कशी करावी? कोणला उपदेश द्यावा, कोणाला देऊ नये अशा एकना अनेक गोष्टी आर्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये सांगितल्या आहेत.

दरम्यान आर्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये व्यक्तीची अशी काही लक्षणं सांगितली आहेत, आर्य चाणक्य म्हणतात ही लक्षणं जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीमध्ये दिसत असतील तर अशा व्यक्तीला आपल्या मेहनतीची कमाई देण्यापूर्वी हजारदा विचार करा, अशा व्यक्तीला मदत करणं व्यर्थ अससंत, जाणून घेऊयात आर्य चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे त्याबद्दल.

आर्य चाणक्य म्हणतात जर तुमचा मुलगा स्वर्थी असेल तर चुकूनही त्याच्या हातात तुमची संपत्ती देऊ नका कारण कालंतराने तो तुम्हालाही विसरू शकतो, अशा वेळी तुम्ही अडचणीत सापडू शकता. जर तुमच्या मुलाला एखादं व्यसन असेल तर अशा मुलालाही तुमच्या संपत्तीपासून दूरच ठेवा कारण तो तुमची संपत्ती कधीही विकून तुम्हाला अडचणीत आणू शकतो.

पुढे चाणक्य यांनी असंही म्हटलं आहे, की ज्या माणसांना तुम्ही केलेल्या उपकाराची जाणीव नसते अशा माणसांना चुकूनही मदत करू नका, कारण काहीही झालं तरी तो आपला खरा रंग वेळ येताच तुम्हाला दाखवू शकतो, त्यामुळे अशा माणसांपासून सावधान राहण्याचा सल्ला आर्य चाणक्य देतात. तसेच आळशी माणसांनाही धन देऊ नका असंही आर्य चाणक्य यांनी म्हटलं आहे.