Chanakya Niti : या लोकांची संगत म्हणजे साक्षात मृत्यूसोबत राहणं, चाणक्य काय म्हणतात?

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात या जगात असे काही लोक असतात, ज्यांच्यासोबत राहणं, म्हणजे साक्षात मृत्यूसोबत राहणं होय. तुमचा कधी घात होईल याचा काही नियम नाही, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

Chanakya Niti : या लोकांची संगत म्हणजे साक्षात मृत्यूसोबत राहणं, चाणक्य काय म्हणतात?
Chanakya
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 04, 2026 | 7:05 PM

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथाच्या पहिल्याच अध्यायामध्ये व्यक्तीच्या स्वभावाचे विविध पैलू सांगितले आहेत. चाणक्य म्हणतात आपल्याला आयुष्यात दोन प्रकारचे लोकं भेटतात. एक जे आपल्याबद्दल खूप चांगला विचार करत असतात. वेळ पडली तर आपल्या भल्यासाठी प्रसंगी असे लोक कठोर देखील बनतात. कारण आपलं चांगलं व्हावं असंच त्यांना वाटत असतं. परंतु काही लोक असे देखील असतात. जे लोक फक्त वरून आपल्याशी गोड बोलतात, परंतु आतून मात्र ते नेहमी आपल्याबद्दल वाईटच चिंतीत असतात. असे लोक आपल्याला ओळखता आले पाहिजेत. कारण आपण जर असे लोक ओळखले नाहीत, त्यांच्यावर विश्वास ठेवला तर भविष्यात आपल्यावर पश्चतापाची वेळ येऊ शकते. या जगात असेही काही लोक असतात, ज्यांची संगत किंवा त्यांच्या सोबत राहणं म्हणजे साक्षात मृत्यूसोबत राहणं होय, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

विश्वासघातकी पती, पत्नी – चाणक्य म्हणतात पती आणि पत्नीचं नातं हे रथाच्या चाकासारखं असतं, दोन्ही चाक समान वेगाने धावले तर संसाराचा गाडा पुढे जातो, परंतु जर यातील एक चाक जरी मागे पडलं तरी मात्र संसाराचं वाटोळं होतं. पती-पत्नीच्या नात्यात विश्वास खूप महत्त्वाचा असतो, जर तुमचा नात्यामध्ये सारखा विश्वास घात होत असेल, तर अशा नात्यामध्ये राहण्यात काहीही अर्थ नाही. जर तुमचा पती किंवा पत्नी विश्वासघातकी असेल तर अशा व्यक्तीसोबत न राहिलेलंच बरं, कारण अशा नात्यामुळे अनेकदा तुमच्या जीवाला देखील धोका होऊ शकतो, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

Loading...

धोकेबाज मित्र – चाणक्य म्हणतात या जगात जर माणसाठी सर्वात जवळचा नातं कोणतं असेल तर ते म्हणजे तुमचा मित्र होय, जेव्हा तुमच्यावर वाईट वेळ येते, तुमचे सर्व मित्र तुमची साथ सोडतात, तेव्हा तुमचा मित्र मात्र तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो. परंतु जेव्हा हाच मित्र तुम्हाला धोका देण्याचा प्रयत्न करतो, जेव्हा ही गोष्ट तुमच्या लक्षात येते, तेव्हा अशा मित्रांसोबत न राहिलेलच बरं, कारण यामुळे तुमच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, विश्वासघातकी मित्र त्याच्या फायद्यासाठी तुमचा जीव देखील डावावर लावू शकतो, असं चाणक्य यांनी चाणक्य नीतीमध्ये म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us