Chanakya Niti : चाणक्यांनी सांगितली श्रीमंतीची त्रिसूत्री, घरात येईल पैसाच पैसा
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आर्य चाणक्य हे एक अर्थतज्ज्ञ देखील असल्यामुळे पैसा कुठे खर्च करायचा आणि कुठे खर्च टाळायचा तसेच तुमच्या हातात असलेल्या पैशांचं नियोजन कसं करायचं? याबाबत त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटीनी तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या की आजच्या काळात देखील मार्गदर्शक ठरतात. चाणक्य हे एक मोठे अर्थतज्ज्ञ देखील असल्यामुळे त्यांनी आपल्या ग्रंथामध्ये आर्थिक बाबींसदर्भात अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. माणसाने पैसा कुठे खर्च करावा? कुठे पैसा खर्च करणं टाळावं? पैशांची बचत कशी करावी? माणसाने आपल्या हातात असलेल्या पैशांचं नियोजन कसं करावं? याबाबत चाणक्य यांनी चाणक्य नीतीमध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य यांनी चाणक्य नीतीमध्ये श्रीमंतीची एक त्रिसूत्री सांगितली आहे. चाणक्य म्हणतात कोणताही मनुष्य जर या मार्गाने गेला तर त्याला त्याच्या आयुष्यात कधीही पैशांची कमी पडणार नाही. चला तर मग जाणून घेऊयात ही त्रिसूत्री नेमकी आहे तरी काय? आणि चाणक्य त्याबाबत काय म्हणतात ते?
बचत – चाणक्य म्हणतात जर तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर आयुष्यात बचतीशिवाय पर्याय नाही. तुमच्याकडे दररोज लाखो रुपये येतात, परंतु त्यामधून बचत काहीच होत नाही, तर त्याचा काहीही उपयोग नाही. कारण ते पैसै कधीही तुमच्या घरात साठवून राहणारच नाहीत. तर घरात पैसे टिकवण्यासाठी तुम्हाला जाणीवपूर्वक पैशांची बचत ही करावीच लागेल. समजा तुम्ही दर महिन्याला शंभर रुपये कमवत असाल तर त्यातून तुम्ही 25 रुपयांची बचत केलीच पाहिजे, लक्षात ठेवा हीच तुमची जमापुंजी आहे, ज्या प्रमाणे थेंबा थेंबाने तळं साचतं तसेच तुम्ही देखील याच बचतीमधून एक दिवस श्रीमंत व्हाल, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
संयम – चाणक्य म्हणतात माणसाच्या आयुष्यात संयम अतिशय महत्त्वाचा असतो. कारण जेव्हा तुमच्याकडे पैसे असतात तेव्हा तुम्ही कुठेही गेलात तर तुम्हाला तेथील एखादी वस्तू खरेदी करण्याचा मोह हा होतोच. अशा गोष्टींमध्ये तुमचा प्रचंड पैसा खर्च होतो, त्यामुळे माणसाकडे संयम असावा, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
आर्थिक शिस्त – चाणक्य म्हणतात तुम्हाला जर तुमच्या आयुष्यात श्रीमंत व्हायचं असेल तर आर्थिक शिस्त ही अतिशय महत्त्वाची आहे, ज्या व्यक्तीच्या आयुष्यात आर्थिक शिस्त आहे, त्या व्यक्तीला कोणतीही शक्ती श्रीमंत होण्यापासून रोखू शकत नाही.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)