Chanakya Niti : आयुष्यात तुम्हाला यश मिळवायचंय?, चाणक्यांची ही निती तुम्ही नक्की वाचा…

| Updated on: May 16, 2021 | 8:08 AM

Chanakya Niti : जर तुम्हाला यश मिळवायचे असेल तर तुमचे मन स्थिर ठेवणं महत्वाचे आहे, कारण केवळ स्थिर मनाने कोणतेही काम समर्पणाने करता येते. तरच आपण त्या कार्याचा आनंद मिळू शकतो आणि फळही...!

Chanakya Niti : आयुष्यात तुम्हाला यश मिळवायचंय?, चाणक्यांची ही निती तुम्ही नक्की वाचा...
Chanakya Niti
Follow us on

मुंबई : आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांची धोरणं, त्यांनी अवलंबलेल्या निती जगप्रसिद्ध आहेत कारण त्यांनी त्यांच्या जीवनातील प्रत्येक सुख दु:खाच्या कारणांचा त्यांनी मुळाशी जाऊन शोध घेतला. आचार्य चाणक्य यांना खूप अगोदर कोणत्याही परिस्थितीचा अंदाज येत असे. त्यांच्या योजना इतक्या मजबूत होत्या की कोणालाही त्याचा सुगावाच लागत नव्हता आणि शत्रू अगदी जाळ्यात फसायचा. आचार्यांची तीक्ष्ण बुद्धी, अनुभव आणि धोरणांमुळे चंद्रगुप्त मौर्य सम्राट बनले. आजही आचार्य यांच्या जीवन विचारांमधून बरेच काही शिकण्यासारखं आहे. (Chanakya niti demerit Can Spoil your hardwork Acharya Chanakya)

अनवस्थितकायस्य न जने न वने सुखम्,
जनो दहति संसर्गाद् वनं संगविवर्जनात…

या श्लोकाद्वारे आचार्य चाणक्य असं म्हणतात, “ज्याचे मन स्थिर नसतं, त्याला अलोट माणसांच्या गर्दीत वा एकटेपणात सुख मिळत नाही. अशी व्यक्ती लोकांमध्ये मत्सर आणि एकटेपणात पश्चाताप करतात.”

या श्लोकाचा अर्थच असा आहे की, जर खरोखरच यशस्वी व्हायचे असेल तर चंचल मनावर नियंत्रण ठेवणे महत्वाचे आहे. ज्याचं मन नियंत्रणात आहे, तो काहीही साध्य करू शकतो. परंतु ज्याचे मन चंचल आहे, त्या व्यक्तीने कितीही प्रयत्न केले तरी त्याची मेहनत फुकट जाण्याची शक्यता असते. कारण त्याचं मन कधीच एका जागेवर थांबत नसतं. ते सतत इथून तिथे आणि तिथून तिथे जात असते.

त्यामुळे परिश्रम करताना देखील एकाग्र चित्ताने न करता तो सतत विचलित होत असतो. अशा व्यक्तींचं मन इतरांची प्रगती पाहून जळायला होतं आणि ते निराश होतात. अशा व्यक्ती लोकांच्या गर्दीत किंवा एकटेपणात आनंदी राहत नाहीत.

म्हणूनच, जर तुम्हाला यश मिळवायचे असेल तर तुमचे मन स्थिर ठेवणं महत्वाचे आहे, कारण केवळ स्थिर मनाने कोणतेही काम समर्पणाने करता येते. तरच आपण त्या कार्याचा आनंद मिळू शकतो आणि फळही…! गीतेमध्येही भगवान श्रीकृष्णाने मनावर नियंत्रण ठेवण्याचे महत्त्व विषद केले आहे. असे म्हटले आहे की, “ज्यांनी मनाला जिंकलं त्यांनी सगळं जिंकलं, जे मनाने हरले ते काहीच जिंकू शकत नाही”

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

(Chanakya niti demerit Can Spoil your hardwork Acharya Chanakya)

हे ही वाचा :

Chanakya Niti | व्यक्तीची मती भ्रष्ट करतात हे अवगुण, यांचा त्याग करणेच बरं