Chanakya Niti | तुमच्या यशाचा सर्वात मोठा शत्रू आहे ‘हा’ दोष, लवकरात लवकर सोडा अन्यथा नुकसान होणार

| Updated on: Mar 31, 2021 | 3:30 PM

आचार्य चाणक्य यांच्या अशा अनेक गोष्टी आहेत जी व्यक्तीला जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवतात (Chanakya Niti).

Chanakya Niti | तुमच्या यशाचा सर्वात मोठा शत्रू आहे हा दोष, लवकरात लवकर सोडा अन्यथा नुकसान होणार
Chanakya Niti
Follow us on

मुंबई : आचार्य चाणक्य यांच्या अशा अनेक गोष्टी आहेत जी व्यक्तीला जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवतात (Chanakya Niti). आचार्य चाणक्य यांनी या गोष्टींचा उल्लेख आपल्या महान ग्रंथ चाणक्य नीतीमध्ये केला आहे. त्याच चाणक्या नीतीमध्ये व्यक्तीच्या एका अवगुणाला त्याचा सर्वात मोठाी शत्रू सांगण्यात आलं आहे. चला जाणून घेऊ काय म्हणते चाणक्य नीती (Chanakya Niti Know Which Is The Biggest Enemy Of Your Success) –

काय सांगते चाणक्य नीती?

इर्षा म्हणजेच हेवा वाटणे याला आचार्य चाणक्य व्यक्तीच्या यशाचा सर्वात मोठा शत्रू मानतात. त्यांच्या मते इर्षा दुसऱ्यांच्या नजरेत तुमचं महत्त्व कमी करतात. जेव्हा कुणी व्यक्ती कुणाचा हेवा करतात तेव्हा तो कधीही स्वत:च्या उणीवांकडे लक्ष देत नाही. त्याला नेहमी असं वाटत असतं की तो स्वत: खूप मेहनत करतो पण दुसऱ्यावा सहजपणे सर्वकाही मिळून जाते.

व्यक्तीच्या मनात प्रत्येक वेळी हेच सुरु राहाते की तो समोरच्याला कशा पद्धतीने यशस्वी होण्यापासून रोखावं. त्यासाठी ती कितीही प्रयत्न करायला तयार असते. चुकीच्या दिशेने केलेले प्रयत्न त्यांच्या आयुष्याला आणखी अडचणीत आणतं. त्यामुळे व्यक्तीचा मुल्यवान वेळ आणि धन खर्च होतो, त्याशिवाय त्या व्यक्तीची मानसिक शांतीही भंग होते.

इर्षा करणारी व्यक्ती खरंतर दुसऱ्याचं नाही तर स्वत:चं नुकसान करतो. इर्षामुळे केलेल्या त्याच्या चुकीच्या प्रयत्नांमुळे त्याची प्रतिमा खराब करते. समाजात त्याचा मान-सन्मान कमी होतो. त्यामुळे दुसऱ्या व्यक्तीच्या यशापासून इर्षा करण्याशिवाय स्वत:तील उणीवांकडे लक्ष द्या आणि त्या दूर करण्यासाठी प्रयत्न करा.

दुसऱ्याची इर्षा करण्यापेक्षा ती व्यक्ती यशस्वी का आहे, त्यासाठी तो काय वेगळं करतोय जे तुम्ही करत नाहीत, याकडे लक्ष द्या. त्याच्या गुणांपासून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा. जर जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर त्या व्यक्तीने इर्षाच्या या अवगुणाला सोडून द्यावं. इर्षा सोडून दुसऱ्यांपोसून काही शिकण्याचा प्रयत्न करा, असं चाणक्य सांगतात.

Chanakya Niti Know Which Is The Biggest Enemy Of Your Success

संबंधित बातम्या :

Chanakya Niti | भ्रष्ट स्त्रीसाठी पती सर्वात मोठा शत्रू, लोभी आणि मूर्ख व्यक्ती कुणाला शत्रू मानतात? जाणून घ्या

Chanakya Niti : ‘हे’ पाच गुण तुमच्यात असतील, तर तुम्ही जीवनात कुठली समस्या सोडवू शकता